शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनात आढळली पायरेटेड पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:19 IST

साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला.

स्नेहा मोरे उस्मानाबाद : येथील साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हिंगलासपूरकर नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले असता, कचोरीच्या स्टॉलच्या बाजूला पायरेटेड पुस्तकांची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते म्हणाले, अजून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झालेले नाही. त्याआधीच कचोरी आणि वडा पावच्या स्टॉलच्या बाजूला ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि ‘कोल्हाट्याचे पोर’ ही पायरेटेड पुस्तके आढळून आली. याबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके येथे उपलब्ध होती. ‘कोल्हाट्याचे पोर’ची छापील किंमत १२५ रुपये आहे. मात्र, पायरेटेड पुस्तक १५० रुपयांना विकले जात होते. ‘आमचा बाप आणि आम्ही’ ही छापील किंमत १५० रुपये असून, पायरेटेड पुस्तकावर २५० रुपये किंमत टाकण्यात आली आहे.सरकारने कडक कायदा करून बंदी आणावी. आम्ही संयोजकांकडे तक्रार केली आहे, असेही हिंगलासपूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दरम्यान, ही पुस्तके मी रद्दीतून विकत घेतली, असे विक्रेत्याने सांगितले. मात्र, अशी नवीकोरी पुस्तके रद्दीत कशी विकली जातील, असा सवाल हिंगलासपूरकर यांनी उपस्थित केला. संयोजकांकडे तक्रार केल्यानंतर पुस्तके जप्त करून संबंधित विक्रेत्यास बाहेर काढण्यात आले.।मराठवाड्यात आठ विक्रेते; पायरसी गुन्हामराठवाड्यात पायरेटेड पुस्तकांचा व्यवहार करणारे ८ विक्रेते आहेत. अनेक जुन्या पुस्तकांना वाचकांकडून आजही चांगली मागणी आहे. ‘बलुतं’ या पुस्तकाला ४० वर्षांनंतरही मागणी आहे. याचा फायदा घेऊन पायरसीचे प्रकार घडत आहेत. संमेलनातच असे प्रकार होणे पूर्ण चुकीचे आहे. आम्ही प्रकाशक संमेलनात आधीच पुस्तकांवर सवलत जाहीर करीत असतो. गैरव्यवहार करणारे विक्रेते जास्त किंमत लावून वाचकांची फसवणूक करीत आहेत. पायरसी हा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन