पाेलीस बंदाेबस्तात आठ तालुक्यांना ऑक्सिजन पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:31+5:302021-05-11T04:34:31+5:30

तामलवाडी : मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील तामलवाडी येथील गाेरस गॅसेस या प्राणवायू (ऑक्सिजन) तयार करणाऱ्या कंपनीकडून सध्या जिल्ह्याला ...

Oxygen supply to eight talukas in Palis Banda Basta | पाेलीस बंदाेबस्तात आठ तालुक्यांना ऑक्सिजन पुरवठा

पाेलीस बंदाेबस्तात आठ तालुक्यांना ऑक्सिजन पुरवठा

तामलवाडी : मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील तामलवाडी येथील गाेरस गॅसेस या प्राणवायू (ऑक्सिजन) तयार करणाऱ्या कंपनीकडून सध्या जिल्ह्याला प्रतिदिन एक हजार ३८० ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा केले जात आहेत. हे सिलिंडर पाेलीस बंदाेबस्तात आठ तालुक्यांच्या रूग्णालयांपर्यंत पाेहाेचविले जात आहेत.

काेराेनाचे संकट तीव्र झाले आहे. रुग्णसंख्येत दरराेज वाढ हाेत आहे. क्रिटिकल रुग्णांना ऑक्सिजनची माेठ्या प्रमाणात गरज भासत आहे. यापैकी काही गरज मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तामलवाडी स्थित गाेरस गॅसेस या कंपनीकडून भागविली जात आहे. ऑक्सिजनची मागणी झपाट्याने वाढत असल्याने ही कंपनी तीन पाळ्यांमध्ये चालविली जात आहे. २५ कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी दवाखान्यांना प्रतिदिन सुमारे एक हजार ३८० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. हा ऑक्सिजन आठ तालुक्यांत मागणीनुसार वितरित केला जात आहे. वितरणावेळी कुठल्याही स्वरूपाचा धाेका हाेऊ नये, यासाठी साेबत पाेलीस बंदाेबस्त दिला जात आहे. या ऑक्सिजनच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत हाेत आहे.

चाैकट...

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक राैशन यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी विजयसिंह मरोड, तामलवाडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या प्रयत्नातून ‘माझा जिल्हा काेराेनामुक्त जिल्हा’ या माध्यमातून जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

आठ तालुक्यांत ऑक्सिजन...

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दवाखान्यात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू दिला जात नाही. ऑक्सिजनचे सिलिंडर सुरक्षितरीत्या दवाखान्यात पाेहाेचावेत, यासाठी साेबत पाेलीस कर्मचारी दिले जात आहेत, असे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.

तीन पाळ्यांत काम...

ऑक्सिजन तयार करण्यासाठी प्रतिदिन २५ कामगार काम करतात. हे काम तीन पाळ्यांत चालते. आमच्या कंपनीच्या माध्यमातून आठ तालुक्यांत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

-संतोष कुरे, व्यवस्थापक, गोरस गॅस.

Web Title: Oxygen supply to eight talukas in Palis Banda Basta