शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत पत्नीच्या खूनप्रकरणी पतीसह चौघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 19:36 IST

उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दिपाली मारूती बानगुडे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील वाकडी येथील एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत खून केल्याप्रकरणी पतीसह चौघांना भूम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ तसेच प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़

याबाबत शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दिपाली मारूती बानगुडे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या आईने २५ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा रूग्णालयातील चौकी अंमलदाराकडे जबाब नोंदवून फिर्याद दिली होती़ विवाहितेचा पती मारूती शंकर बानगुडे, दीर अमोल शंकर बानगुडे, सासरा शंकर पांडुरंग बानगुडे व सासू छाया शंकर बानगुडे (सर्व रा़ वाकडी ता़परंडा जि़उस्मानाबाद) यांनी दिपालीचा जाच करून २२ जानेवारी २०१७ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत खून केल्याचे म्हटले होते़ या जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात उपरोक्त चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोनि डी़ए़डंबाळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ 

या प्रकरणाची भूम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) आऱव्ही़उत्पात यांच्या समोर सुनावणी झाली़ या प्रकरणात सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले़ पीडितेचा दुसरा मृत्यूपूर्व जबाब, पंच, साक्षीदारांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावा व शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्या़ आऱव्ही़ उत्पात यांनी चारही आरोपींना भादंविचे कलम ३०२ सह कलम ३४ अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावल्याचे अ‍ॅड़ जाधवर यांनी सांगितले़ 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय