शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'ने धडा शिकवला; उमरग्यात फटाके फोडून जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:05 IST

शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला

उमरगा : पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलाने घेतला असून आज पहाटे एयरस्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त केले आहेत. सैन्याच्या या जोरदार कारवाईस 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्याचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे. उमरग्यात भाजपच्यावतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भारतीय सैन्य दलाने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांवर तुफानी हल्ला केला. पहेलगाम येथील पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्याला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले जोरदार प्रत्युत्तर असल्याच्या भावना व्यक्त करत भाजपच्यावतीने शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करून देशभक्तीपर घोषणा देत भारतीय सैन्यदलाच्या धाडसाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. भाजप पदाधिकारी, नागरिकांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या जोरदार घोषणानी परिसर निनादून गेला होता.

यावेळी डॉ. कपिल महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, ज्येष्ठ नेते सुनील कुलकर्णी, शहर मंडल अध्यक्ष अॅड. साईराज टाचले, संतोष वकारे, डॉ. सचिन तावशीकर, संदीप चौगुले, अॅड. काशिनाथ राठोड, अनिल सगर, विक्रम मस्के, व्यापारी महासंघ उमरगाचे सचिव शिवप्रसाद लड्डा, मनीष सोनी, श्रीधर ढगे, नितीन नांगरे, समर्थ दंडगे, संजीवन कुंभार, महेश पाटील, महादेव भोसले, संजीव विभुते, रामदास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :dharashivधाराशिवOperation Sindoorऑपरेशन सिंदूर