शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद येथे फटाका कारखान्यातील स्फोटात मजूर जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 17:53 IST

वाशी तालुक्यातील इंदापूर येथील फटाका कारखान्यात स्फोट होवून एक मजूर जागीच ठार तर कारखाना मालकाचा एक नातलग गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देवाशी तालुक्यातील इंदापूर-गोजवडा- तेरखेड्याच्या सरहद्दीवर समीर मुलानी यांचा रॉयल फ ायर वर्क्स या नावाने फटाके बनविण्याचा कारखाना आहे. मुख्य गोडाऊनमध्ये सकाळी कच्चा माल काढण्यासाठी दोघेजण गेले असता हा स्फ ोट झाला. या स्फ ोटामध्ये मुख्य गोडाऊनच्या छतासह भिंंतीच्या विटा दूरवर फेकल्या गेल्या.

वाशी (जि. उस्मानाबाद) : वाशी तालुक्यातील इंदापूर येथील फटाका कारखान्यात स्फोट होवून एक मजूर जागीच ठार तर कारखाना मालकाचा एक नातलग गंभीर जखमी झाला. ही घटना वाशी तालुक्यातील इंदापूर येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. स्फोट एवढा मोठा होता की सदर इमारत स्लॅपसह जमीनदोस्त होऊन भिंंतीच्या विटा शंभर फूट दूरपर्यंत फेकल्या गेल्या. 

वाशी तालुक्यातील इंदापूर-गोजवडा- तेरखेड्याच्या सरहद्दीवर समीर मुलानी यांचा रॉयल फ ायर वर्क्स या नावाने फटाके बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्याच्या मुख्य गोडाऊनमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट  होऊन कामगार रवींद्र दत्तू लगाडे (वय ५०, रा. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारखाना मालकाचा नातलग सोहेल शेख (वय १९, रा. तेरखेडा) हा गंभीर जखमी झाला. जखमीस तात्काळ उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

फटाका बनवण्याच्या मुख्य गोडाऊनमध्ये सकाळी कच्चा माल काढण्यासाठी दोघेजण गेले असता हा स्फ ोट झाला. या स्फ ोटामध्ये मुख्य गोडाऊनच्या छतासह भिंंतीच्या विटा दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये रवींद्र लगाडे यांच्या अंगावर भिंंत पडून ते त्याखाली दबले गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर सोहेल शेख हा स्फोटाच्या तीव्रतेमुळे दूरवर फेकला जावून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती कळताच प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर धुमाळ, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे, पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड यांच्यासह महसूल व पोलीस दलाच्या कर्मचा-यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. मयतास पोलीसांनी ढिगा-याखालून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.

हा २५ वा बळी दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाशीच्या तहसीलदाराना पंचनामा करून वस्तुनिष्ठ अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या. तहसीलदारांच्या अहवालानंतर फटाका कारखान्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे. दर एक ते दोन वर्षानंतर तालुक्यातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होण्याची शृंखला चालूच असून, आजतागायत जवळपास २५ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, शनिवारी स्फोट होताच कारखान्याच्या आवारातील फटाके बनविण्याची दारू गायब करण्यासाठी धावपळ होताना दिसून आली.