: तालुक्यातील थोरलेवाडी येथे रविवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील एका आरोपीस पोलिसांनी आळंद तालुक्यातून जेरबंद केले.
सोमवारी रात्री थोरलेवाडी खून प्रकरणातील आरोपी आळंद तालुक्यातील बटकेरवाडी गावात नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांच्या पथकाने रात्री उशिरा त्या गावात नातेवाईकाच्या शेतातील घरात धाड मारली. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला. यावेळी झालेल्या धरपकडीत रूपचंद बद्रीनाथ कोराळे नामक आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश मिळाले तर इतर आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडलेला आरोपी हा गुन्ह्यातील सातव्या नंबरचा आरोपी असून, इतर आरोपीही लवकरच पकडले जातील, असे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी सांगितले.