शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हवेय? अगोदर वृक्ष लावा; हगलूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

By गणेश कुलकर्णी | Updated: August 21, 2023 16:36 IST

गावकऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.

धाराशिव : गावातील नव्याने विवाह केलेल्या दाम्पत्याने विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या घरासमोर नवीन वृक्ष लागवड करून फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखविल्यानंतरच विवाह नोंदणीचा दाखला देण्याचा ठराव घेत तुळजापूर तालुक्यातील हगलूर ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

हवा शुद्ध करण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. झाडे आणि वनस्पती मानवी आरोग्यासोबतच पर्यावरणही निरोगी ठेवतात. ते हवामानावरही नियंत्रण ठेवतात. अधिक झाडे लावल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहते. हीच बाब लक्षात घेत तालुक्यातील हगलूर येथील सरपंच ॲड. जयपाल पाटील यांनी मांडलेल्या संकल्पनेतून नवदाम्पत्याने घरासमोर एक झाड लावून झाडाचा फोटो काढून ग्रामपंचायत कार्यालयात दाखवल्यानंतर विवाह प्रमाणपत्र देण्याचा ठराव घेण्यात आला. गावकऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.

यावेळी सरपंच ॲड. जयपाल पाटील, उपसरपंच महेश गवळी, ग्रामसेविका एस. एस. कदम, माजी सरपंच नालंदा पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अंकुश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दराडे, रोजगार सेवक जयकुमार घुगे, संगणक परिचालक रफिक शेख, शिपाई आणि जलसुरक्षक दिनकर गवळी, ग्रामपंचायत सदस्य अलका पाटील, कौशल्याबाई घुगे, शीतल घुगे, रंजना पवार, संजय पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वृक्षारोपण वाढणे महत्वाचेगावामध्ये वृक्षारोपण होऊन चांगले वातावरण निर्माण होईल. तसेच आरोग्यदायक वातावरण राहील. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास लोकांना जाणवणार नाही. यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ‘एक झाड लावा आणि त्याचा फोटो ग्रामपंचायतीला दाखवा’ असा नियम लागू केला आहे. त्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.- ॲड. जयपाल पाटील, सरपंच

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOsmanabadउस्मानाबाद