राष्ट्रवादीकडून रोहिदास जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:36 AM2021-03-01T04:36:36+5:302021-03-01T04:36:36+5:30

नूतन विद्यालयात विविध कार्यक्रम उस्मानाबाद : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे संत रोहिदास महाराज ...

NCP celebrates Rohidas Jayanti | राष्ट्रवादीकडून रोहिदास जयंती साजरी

राष्ट्रवादीकडून रोहिदास जयंती साजरी

googlenewsNext

नूतन विद्यालयात विविध कार्यक्रम

उस्मानाबाद : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे संत रोहिदास महाराज व विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व शिक्षकांनी मराठी काव्यगायन केले. यावेळी मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, संजय जाधव, सहदेव मुळे, रवी मुळे, चेतन माशाळकर, सारिका उमरकर, शीतल उटगे, दीपाली राऊत, अपर्णा देशमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ठाण्याच्या आवारात ८३ वाहने पडून

तुळजापूर : येथील पोलीस ठाणे हद्दीत आढळून आलेली व विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी, चारचाकी अशी एकूण ८३ वाहने धूळखात पडून आहेत. यातील २७ वाहनांना नंबरप्लेट नाहीत. त्यामुळे संबंधित वाहनमालकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून आपल्या वाहनाची ओळख पटवून ही वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक राठोड यांनी केले आहे.

‘माझा गाव’ अभियान खुदावाडी येथे सुरू

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे ‘माझा गाव, सुंदर गाव’ अभियानाला प्रारंभ झाला. ग्रामस्थांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून यात सहभाग घेतला. यावेळी सरपंच शरद नरवडे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी कापसे, शालेय व्यवस्थापन समितीचे संगाप्पा चिनचोले यांच्यासह बचत गटातील महिला, आशा कार्यकर्ती, ग्रामस्थ उपस्थित होते.

अध्यक्षपदी शहा, सचिवपदी पवार

उमरगा : येथील एस. टी. कामगार सेनेच्या उमरगा आगारातील शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यात अध्यक्षपदी जिलानी शहा तर सचिवपदी बाबूराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष नागेश बडगिरे, सय्यद, कार्याध्यक्ष रवी माने, सहसचिव बालाजी माने, कोषाध्यक्ष संतोष गोसावी, प्रसिद्धीप्रमुख कालिदास जाधव, महिला प्रतिनिधी आरती सगर, मोरे यांचा समावेश आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा संपर्कप्रमुख बालाजी पाटील होते. यावेळी धनराज आतकरे, नामदेव व्हनाळे, बबन भानवलकर, सुनील शेंडगे, दिलीप चौधरी, रघुनाथ लकडे आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा काजळा येथे सत्कार

काजळा : येथील श्री रामानंद महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णूदास आहेर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रवीण क्षीरसागर, उपसरपंच जिजाबाई मडके, शारदाताई हाजगुडे, किशोर लिंगे उपस्थित होते. यावेळी सीमा शिंदे, राम लिंगे, अनिल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जगदीश करंडे यांनी केले. अर्पिता आकोसकर या विद्यार्थिनीने मराठी राजभाषा दिन या विषयावर मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रभारी प्राचार्य नितीन वाकडे, सहशिक्षक दीपक खारगे, राजू पवार, आर. डी. पवार, पंडित पवार, विवेक पाटील, संतोष राठोड, प्रा. मालोजी पवार, प्रा. बाळासाहेब मडके, प्रा. जगदीश करंडे, रमाकांत वाघमारे, खैरूद्दीन सय्यद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कीर्ती पाटील यांनी केले तर आरती आकोसकर यांनी आभार मानले.

सप्ताहाची सांगता

लोहारा : उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथे संत शिरोमणी मारूती महाराज मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवारी ह. भ. प. महेश महाराज माकणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

हुजूर यांचा दौरा

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. इनामदार हे दिनांक १ मार्च रोजी येथे येणार असून, सकाळी १० वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती होणार आहेत.

Web Title: NCP celebrates Rohidas Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.