पूर्व वैमनस्यातून खून, सतराजणांविरुद्ध गुन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:08+5:302021-04-10T04:32:08+5:30

थोरलीवाडी येथील ८५ वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती तुकाराम भीमा खवडे शेतातून सायंकाळी घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांचा शाेध ...

Murder out of enmity, crime against seventeen | पूर्व वैमनस्यातून खून, सतराजणांविरुद्ध गुन्ह

पूर्व वैमनस्यातून खून, सतराजणांविरुद्ध गुन्ह

googlenewsNext

थोरलीवाडी येथील ८५ वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती तुकाराम भीमा खवडे शेतातून सायंकाळी घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांचा शाेध सुरू केला असता, शेतातील विहिरीच्या पाण्यात ते बुडाल्याचे दिसून आले. पाण्यात दाेन जनावरेही पडली हाेती. ग्रामस्थांनी धाव घेत सायंकाळीच जनावरे सुखरूप बाहेर काढली. घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक

घटनास्थळी पोहोचले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने नातेवाईकांसाेबत चर्चा करुन मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढण्याचे ठरले. गुरुवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह बाहेर

काढून शवविच्छेदनासाठी उमरगा उपजिल्हा

रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी आकस्मात मृत्युची नाेंद झाली हाेती. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून वृद्धाचा खून करून प्रेत विहिरीत फेकल्याचा आराेप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. यासाठी नातेवाईकांनी पाेलीस ठाण्यात ठाण मांडले

होते. गुन्हा नोंद झाल्याशिवाय

अंत्यसंस्कार न करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली. त्यामुळे नातेवाईकांची समजूत काढण्याचा उपविभागीय पाेलीस अधिकारी अनुराधा

उदमले, पाेलीस निरिक्षक मुकुंद अघाव यांनी प्रयत्न केले. मात्र ताेडगा निघाला नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य

ओळखून गावात दंगल नियंत्रक तैनात करण्यात आले. यानंतरही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. परिणाम वृद्धाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला. अखेर मयताचा मुलगा व्यंकट तुकाराम खवडे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तु भानुदास चिंचोळे, प्रकाश बसवन्ना भोसले, रणजीत भिमसु मेकाले, बालाजी गुंडाप्पा मिसाले, गोविंद गोपाळ कोराळे, वसंत ईश्वर कोराळे, फुलचंद हणमंत यंपाळे, हणमंत राम मिसाले, तुळशिराम भानुदास चिंचोळे, संजय भिमसु मेकाले, सायबन्ना शिवाजी खवडे, नरसप्पा नोताजी पाटील,

गुंडाप्पा बाबु यंपाळे, यलाप्पा बाबु यंपाळे, अनिल राम मेकाले, अविनाश

लक्ष्मण मिसाले, सायबन्ना भानुदास चिंचोळे (सर्व रा. थाेरलीवाडी) यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव हे करीत आहेत.

Web Title: Murder out of enmity, crime against seventeen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.