शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बंदुकीसाठी झाला खून..? राजस्थानी तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी दोन तासात लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 5:51 PM

Rajasthani youth murder case in Tulajapur बंदूकही मिळत नव्हती अन् पैसेही. त्यामुळे आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करून बलवीरचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्देफरशी कामगार बलवीर मेगनलाल वर्मा (२२) हा मागील तीन वर्षांपासून तुळजापूर येथे काम करत होता. मृतदेह बुधवारी सकाळी आपसिंगा रोडवरील मोतीझरा तांडा येथील एका शेतात आढळला.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या एका राजस्थानी तरुणाचा तुळजापुरात खून झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अवघ्या दोन तासांतच तुळजापुरातीलच दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. आणखी एक संशयित घटनेनंतर फरार झाला.

फरशी कामगार बलवीर मेगनलाल वर्मा (२२) हा मागील तीन वर्षांपासून तुळजापूर येथे काम करत होता. त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आपसिंगा रोडवरील मोतीझरा तांडा येथील एका शेतात आढळला. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. दिलीप टिपरसे, सहायक निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण, उपनिरीक्षक विकास दांडे, राहुल रोटे, चनशेट्टी, कर्मचारी एस.एम. गायकवाड, आर. बी. पठाण, संदीप भुतेकर, कल्याण पवार, महेश चौरे, सचिन राऊत, अजय सोनवणे, अमोल बनसोडे, अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेत असतानाच पोलिसांना उस्मानाबाद रोडवरील एका बारमध्ये बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन युवक रक्ताने माखलेल्या कपड्यावर आले होते, असे कळाले. तातडीने तिकडे धाव घेऊन पोलिसांनी त्या तरुणांचे वर्णन मिळविले व त्याआधारे वेताळनगर भागातून सिद्धार्थ अरुण गायकवाड यास संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती घेत राजू सावंत या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले तर आणखी एक संशयित शुभम जाधव हा फरार झाला.

प्लुटोने पटविली आरोपीची ओळख...घटनास्थळावर श्वानपथकासह पोलीस इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासही पाचारण करण्यात आले होते. यावेळी मृतदेहापासून ५० मीटर अंतरावर दारूची बाटली सापडली. श्वानपथकातील भारत मस्के व स्वप्निल ढोणे यांनी दारूच्या बाटलीच्या झाकणाचा वास देऊन संशयित ७ तरुणांना समोर उभे केले तेव्हा प्लुटोने थेट सिद्धार्थ गायकवाड या तरुणावर उडी घेतली. पुढील तपासात शहरातीलच एका हार्डवेअर दुकानात काम करणाऱ्या राजू सावंत याला ताब्यात घेण्यात आले.

बंदुकीसाठी झाला खून..?मृत बलवीर वर्मा याने आरोपींकडून १५ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्याने राजस्थानातून बंदूक आणून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बंदूकही मिळत नव्हती अन् पैसेही. त्यामुळे आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करून बलवीरचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद