शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा बदला खुनाने घेतला; शेतातील पाण्यासाठी भावकीत राडा, बापलेकासह तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:52 IST

वाशी तालुक्यातील बावी (जि. धाराशिव) येथे आप्पा काळे व भाग्यवंत काळे या चुलत भावांमध्ये शेतातील विहिरीचे पाणी घेण्यावरून वाद होता.

वाशी/येरमाळा (जि. धाराशिव) : शेतातील विहिरीचे पाणी घेण्याच्या कारणावरून बावी येथे भावकीतीलच दोन गटांत तुफान राडा झाला. चाकू, कत्ती-कोयत्याने जबर हाणामारी झाल्याने बाप-लेकासह एकूण तिघांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. एक महिला धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून १५ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना ताब्यातही घेतले.

वाशी तालुक्यातील बावी (जि. धाराशिव) येथे आप्पा काळे व भाग्यवंत काळे या चुलत भावांमध्ये शेतातील विहिरीचे पाणी घेण्यावरून वाद होता. रविवारी सायंकाळी हा वाद पुन्हा पेटला. पिकांना पाणी कमी पडत असल्याने आप्पा काळे यांनी भाग्यवंत काळे यांना पाणी देण्यास नकार दिल्याने या दोन्ही गटांत हाणामारी झाली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हाणामारीत सुनील परमेश्वर काळे (२१) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला धाराशिवच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा रात्री मृत्यू झाला. ही माहिती कळताच भाग्यवंत काळे यांच्या गटाने आप्पा काळे यांच्या कुटुंबावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हल्ला चढवला. घरातील आप्पा भाऊ काळे (७०), त्यांचा मुलगा परमेश्वर आप्पा काळे (२२) व पत्नी वत्सला आप्पा काळे यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत आप्पा काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर, परमेश्वर काळे याचा वाशी रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी वत्सला काळे यांना उपचारासाठी धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चाकू, कोयते, दगडांनी मारहाणया घटनेत हल्लेखोर गटांकडून चाकू, कत्ती-कोयते, दगडांचा वापर करण्यात आला. हाणामारीची घटना कळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

खुनाचा बदला खुनाने घेतलासायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आप्पा काळे गटाकडून झालेल्या मारहाणीत सुनील काळे याचा मृत्यू झाला. रुग्णालयात तो मृत पावल्याचे कळताच भाग्यवंत काळे गटाने हल्ला करुन आप्पा काळे यांच्यासह त्यांचा मुलगा परमेश्वर यांचा खून केला.

१५ जणांवर गुन्हे दाखलया घटनेत परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मयत आप्पा काळे यांचा मुलगा राहुल काळे याच्या फिर्यादीवरुन १० जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तर मयत सुनील काळे गटाकडून वंदना भाग्यवंत काळे यांच्या तक्रारीवरून ५ जणांवर गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव