शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बेंगळुरुच्या एमटेक तरुणाची दिल्लीवर चाल; शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पायी भारत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 20:16 IST

farmers protest : शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली.

उस्मानाबाद : अन्नदाता शेतकर्यांवर त्यांच्या हक्कासाठी वर्ष-वर्ष आंदोलन चालविण्याची वेळ येते, हे पाहून व्यथित झालेल्या बेंगळुरुच्या एका उच्चशिक्षित तरुणाने शेतकरीआंदोलनाचा भारतभर जागर घालण्याचा निर्धार करीत पायी यात्रा सुरु केली आहे. मंगळवारी सायंकाळी या तरुणाने चालतच उस्मानाबाद गाठले. यावेळी त्याचा शेतकर्यांसाठी लढणार्या संघटनांनी सन्मान केला.

नागराज कलकुटगर असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे शिक्षण एमटेकपर्यंत झालेले असून, शेतीचा वारसा लाभलेल्या कुटूंबातील या तरुणाने दिल्ली बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कर्नाटकातील मलेमहादेश्वर येथून ११ फेब्रुवारी रोजी पायी यात्रा सुरु केली. दररोज २५ किलोमीटर चालून वाटेत भेटणार्या शेतकर्यांमध्ये कायद्याविरुद्ध जागृती करीत तो निघाला आहे. मध्यंतरी दुसरा लॉकडाऊन लागला तेव्हा काही काळ ही यात्रा स्थिगित केली होती. मात्र, ३ जुलैपासून नागराजने चित्रदुर्ग येथून पुन्हा या यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नागराजने उस्मानाबाद गाठले. तेव्हा येथील किसान सभेच्या वतीने सचिव सुदेश इंगळे यांनी त्याचा सन्मान केला. यावेळी लखीमपूर येथील घटनेचा निषेधही करण्यात आला. उस्मानाबादेत मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी नागराजची पदयात्रा पुढे रवाना झाली. यावेळी किसान सभेच्या पदाधिकार्यांसह नागराजला शुभेच्छा दिल्या.

तो जगला तर जग जगेलमागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज तयार करण्याचे काम मागील वर्षभरात झाले. तरीही शेतकरी मागे सरला नाही. सरकारी यंत्रणांची दमनशाही झुगारून हे आंदोलन सुरू ठेवले आहे. माझ्यासारख्या तरुणास हे सगळे पाहून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की आपण देशभर यात्रा करीत लोकांमध्ये जागृती करावी. माझा उद्देश इतकाच आहे की शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला तर जग जगेल. यासाठीच माझा एक छोटा प्रयत्न सुरु आहे.-नागराज कलकुटगर 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद