शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वाशी ठाण्यावर जमावाचा हल्ला; पोलीस निरीक्षकासह 3 कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 00:34 IST

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून पांगवला जमाव

वाशी (जि. उस्मानाबाद): कोठडीदरम्यान एका आरोपीची प्रकृती खालावून त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाशी ठाण्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.वाशी तालुक्यातील पारा येथील रमज्या लाला काळे यास वाशी पोलिसांनी एक गुन्ह्यातील वॉरन्टमध्ये १ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. त्यास न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्याची प्रकृती खालावल्याने त्यास उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी त्यास सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. यावरून त्याचे नातेवाईक संतप्त झाले. मयताचे शव घेऊन आलेली रुग्णवाहिका सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमावाने वाशी ठाण्यासमोरच लावली.  यानंतर या जमावाने ठाण्यास घेराव घालून दगडफेक सुरू केली. यावेळी वाशी ठाण्याचे निरीक्षक उस्मान शेख, कर्मचारी परशुराम पवार, भागवत झोंबडे हे बाहेर आले असता, झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले. यानंतर पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या ७ नळकांड्या फोडल्या. तेव्हा जमाव पांगला. जखमी पोलिसांना तातडीने वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील निरीक्षक उस्मान शेख गंभीर जखमी झाल्याने त्यांना उस्मानाबादला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक डॉ विशाल खांबे हे वाशीला पोहोचले. त्यांनी तपासाच्या सूचना करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 

टॅग्स :Policeपोलिस