कळंब : माहेरहून तीन लाख रूपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शहागड (जि़ जालना) येथे घडली़पोलिसांनी सांगितले की, शहरातील पुनर्वसन सावरगाव भागात राहणाऱ्या अफरीन यांचा विवाह शहागड येथील आसिफ रहीम बागवान यांच्याशी झाला होता़ लग्नाच्या चार-पाच दिवसानंतरच पती आसिफ बागवान यांच्यासह सासू तस्लीम रहीम बागवान, सासरे रहीम रहेमान बागवान, नणंद शबनम रहीम बागवान यांनी ‘तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मान-पान केला नाही, माहेरहून तीन लाख रूपये घेवून ये’ म्हणून शारीरिक, मानसिक जाच सुरू केला़ तसेच पैशासाठी घरातून हाकलून दिल्याची फिर्याद विवाहिता अफरीन यांनी कळंब पोलीस ठाण्यात दिली़ घटनेचा अधिक तपास प्ऱपोनि मिर्झा बेग हे करीत आहेत़ (वार्ताहर)
तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: June 16, 2015 00:49 IST