शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

'...आता द्या परवानगी'; १०० ट्रॅक्टरचा जथ्था घेऊन मराठा आंदोलक धाराशिव कलेक्टर ऑफिसवर

By बाबुराव चव्हाण | Updated: December 30, 2023 16:24 IST

जाेरदार घाेषणाबाजी, सांजा येथून ५ हजारावर बांधव मुंबईकडे कूच करणार

धाराशिव : मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आंदाेलन करण्यात येणार आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी गावागावातून बांधव मुंबईकडे जाण्याची तयारी करू लागले आहेत. सांजा गावातूनही पाच हजारावर मराठा बांधव १०० हून अधिक ट्रॅक्टरसह मुंबईकडे २० जानेवारी राेजी रवाना हाेणार आहेत. ट्रॅक्टर नेण्यास रितसर परवानगी घेण्यासाठी म्हणून शनिवारी तब्बल शंभराहून अधिक ट्रॅक्टरचा जथ्था थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जाेरदार घाेषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले.

मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची डेडालइन दिली हाेती. मात्र, सरकारकडून आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी बीड येथील इशारा सभेतून आता मुंबईत आंदाेलन करण्याची भूमिका मांडली हाेती. त्यानुसार आता गावाेगावी मराठा बांधवांकडून मुंबईकडे जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांचे नियाेजन करण्यात येऊ लागले आहे. यासाठी लागणाऱ्या इंधनाचे पैसे लाेक वर्गणीच्या माध्यमातून जमा करण्यात येताहेत. धाराशिव तालुक्यातील सांजा येथील मराठा बांधवांनी तब्बल १०० ट्रॅक्टरसह मुंबईला जाण्याचे नियाेजन केले आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून ट्रॅक्टरने मुुंबईकडे जाण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे सांगत शनिवारी तब्बल १०० हून अधिक ट्रॅक्टरचा जथ्था छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पालिकेसमाेरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मराठा बांधवांनी जाेरदार घाेषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. आम्ही शांततेत मुंबईला जाणार आहाेत. प्रशासनाने आमची अडवणूक करू नये, अशी भूमिकाही मराठा बांधवांनी मांडली. जिल्हा कचेरीसमाेरील राेडच्या एका बाजुने ट्रॅक्टची लांबच लांब रांग लागली हाेती.

प्रस्थापित मराठा नेत्यांनी सहभागी व्हावे...मराठा अरक्षणाचे नेते मनाेज पाटील जरांगे यांनी गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळांसाठी लढा सुरू केला आहे. गाेरगरीबांच्या मुलांना आरक्षण मिळावे, यासाठी सुरू केलेल्या या लढ्यात प्रस्थापित मराठा नेत्यांनी सहभागी व्हावे. अन्यथा निवडणुकीमध्ये हेच गाेरगरीब मराठे तुम्हाला दारातही येऊ देणार नाहीत, असा इशाराही यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी दिला.

शिवराय, बाबासाहेबांना अभिवादन...सांजा येथून टॅक्टर रॅली निघाल्यांनतर सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पाेहाेचली. या ठिकाणी शिवरायांना अभिवादन केल्यानंतर ही रॅली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात दाखल झाली. येथे महामानव बाबासाहेबांना अभिवादन करून रॅली नगर पालिकेसमाेरून जिल्हा कचेरीवर धडकली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षण