शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? मनोज जारांगे पाटलांचा घाणाघात

By बाबुराव चव्हाण | Updated: October 5, 2023 07:50 IST

Manoj Jarange Patil: पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना.

धाराशिव - पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना. तुम्हाला पुराव्याचा आधार हवा होता ना? तर आता पाच हजार पुरावे मिळालेत की. त्यामुळे आता मराठ्यांना सरसकट आरक्षण द्याच, तेही पन्नास टक्क्यांच्या आतच अशी मागणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी कळंब येथे केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवली येथे १७ दिवस प्राणांतिक उपोषण केलेल्या मनोज जारांगे यांनी सरकारला ३० दिवसाचा 'अल्टीमेट' देत आंदोलन मागे घेतले होते. ही घटीका आता समीप आली आहे. या अनुषंगाने १४ ऑक्टोबरला अंतरवाली येथे सभा आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जरंगे पाटील यांचा ३० सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू आहे. यानिमित्तानं कळंब येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले, २९ ऑगस्टला मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला,तो आजपर्यंत कायम सुरू आहे. आंदोलन शांततेत सुरू होतं, तिसरा दिवस असताना अचानक ६५ ते ९० वर्षांच्या मातामाऊली, तान्ह्या बाळास मांडीवर घेवुन बसलेल्या आयाबायांवर प्राणघातक हल्ला झाला. रक्तबंबाळ केलं, सतरा सतरा टाके पडले,अनेक छर्रे शरीरात आरपार झाले. याचे कारण अद्यापही समजलं नाही. आरक्षण मागत होतोत, काय गुन्हा अन् पाप केलं, असा निष्ठूर हल्ला केला? याचे सरकारने अद्याप उत्तर दिले नाही.

चार दिवस काय, चाळीस दिवस दिले ... सरकारने चर्चा सुरू केली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, पन्नास टक्क्यांच्या आत लोकसंख्येप्रमाणे मराठा स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिले तरी चालेल या प्रमुख मागण्या. यासाठी चार दिवस वेळ दिला,तो मान्य केला नाही. अध्यादेशासाठी कायद्याने सिद्ध व्हावे लागेल असे सांगण्यात आले.  इतरांना व्यवसायामुळे आरक्षण. मग गायकवाड अहवाल आमच्या बाजुने होता, मराठा शेती करतो, मराठा कुणबी एकच. तरी मराठ्यांना आरक्षण नाही. चार दिवसात हे शक्य नाही असं सांगत पुन्हा चर्चा झाल्या. सत्ताधारी, विरोधक एकत्र बसत महिन्याची वेळ मागितली. मी, अधिकचं दहा दिवस बोनस देत चाळीस दिवस दिले. समिती झाली, ती मुंबई, हैद्राबाद, संभाजीनगर अशी विमानाने धावतेय. पाच हजार पुरावे मिळालेत. आता अडलयं कुठं. यामुळे आता आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, असे जारांगे पाटील यांनी सांगितले. 

दुपारी 2 ची सभा रात्री १० वाजता...दुपारी चारची सभा रात्री दहा वाजता सुरू झाली. तोपर्यंत मोठा जनसागर ताटकळत बसलेला होता. यावर बोलताना जारांगे पाटील यांनी येण्यासाठी उशीर झाला. उपाशी ठेवलं, मनापासून माफी मागतो. यापेक्षा जास्त देण्याकडे माझ्याकडे काहीच नाही. गावागावातील माणसं गाडी पुढं जावू देईनात. डावलून पुढं पाय ओढेना असे बोलुन खंत व्यक्त केली. 

मंत्री, मातब्बरांची शिष्टाई, नियत ढळू दिली नाही... आंदोलना दरम्यान मंत्री, अधिकारी, मातब्बर भेटत होते. हेलपाटे मारत होते, शिष्टाई करत आश्वासन देत होते. मात्र, मंत्र्याने खांद्यावर हात टाकला तरी मी एक इंचभरही नियत ढळू दिली नाही. मरेपर्यंत जातीशी गद्दारी करणार नाही. जातीवर आजवर अन्याय झाला, आता हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय. पत्नी, वडील , लेकरांना सांगून आलोय. आलो तर आरक्षण घेवूनच, नाही तर नाही. यामुळे माझी कोणी काळजी करू नका. लढ्याशी प्रामाणिक आहे, त्यामुळेच समाज एकजूट होवून मागे उभा आहे .मला,आरक्षणाशिवाय दुसरं काही कळत नाही. यामुळे १४ तारखेला अंतरवाली येथे मोठ्यासंख्येने उपस्थित रहा, असे जरंगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबादmarathaमराठा