शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा क्रांती’चा एल्गार आता तुळजापुरातून; आंदोलनाची नव्याने होणार आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:09 IST

सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक बुधवारी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली़

ठळक मुद्देसकल मराठा समाजच्या वतीने पुन्हा नव्याने आंदोलनाची आखणी केली जात आहे. यावेळचे मोर्चे मूक न राहता आक्रमक राहण्याचे संकेत आज दुपारी तुळजापुरात झालेल्या बैठकीतून देण्यात आले़

तुळजापूर (उस्मानाबाद) : ५८ मूकमोर्चे काढूनही या सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांविषयी थोडीही आस्था दिसून आली नाही. ज्या घोषणा सरकारने केल्या, त्या फसव्या आहेत़ एकाही घोषणेवर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजच्या वतीने पुन्हा नव्याने आंदोलनाची आखणी केली जात आहे. यावेळचे मोर्चे मूक न राहता आक्रमक राहण्याचे संकेत आज दुपारी तुळजापुरात झालेल्या बैठकीतून देण्यात आले़

सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक बुधवारी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली़ राज्यभरात ५८ मूकमोर्चे निघाल्यानंतर सरकारला जाग आली़ त्यानंतर त्यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव तरतूद, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक शुल्क माफ, अशा काही घोषणा केल्या होत्या़ त्या निव्वळ फसव्या निघाल्या आहेत़ झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आता मूक नव्हे ‘गनिमी कावा’ पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला़ हा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर राज्यभर असे मोर्चे काढण्यासाठी नव्याने आखणी करण्याचा कार्यक्रम लगेच हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले़

शिवाय, आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात येणार आहे़ यानंतर राज्याच्या इतरही भागात अशी आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी आबासाहेब पाटील, रमेश कैरे पाटील, श्रीमंत कोकाटे, सज्जनराव साळुंके, वसंतराव पाटील, किशोर पवार, जगदीश पाटील, सतिश खोपडे, अर्जुन साळुंके, नितीन पवार, प्रतिक रोचकरी, सज्जन जाधव, जीवनराजे इंगळे, विष्णु इंगळे, जगदीश पलंगे, आलोक शिंदे, सुनिल नागणे, रामभाऊ गायकवाड, विजय पवार, देविदास पाटील, धनंजय देशमुख, भैय्या पाटील, प्रदीप मुंडे उपस्थित होते़

२९ जूनला जागरण-गोंधऴ़मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाचे दुसरे पर्व तुळजापूर येथून सुरु करण्यात येणार आहे़ २९ जून रोजी तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले़ यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़सरकारकडे मागण्या : - मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चत करावी़- शैक्षणिक सवलतींचा जी़आऱ काढावा़- शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे़- अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारagitationआंदोलन