शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वीज तोडल्याने कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सहा महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 13:51 IST

श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यांच्याकडे असलेल्या वीज देयकाच्या थकबाकीपोटी प्रतिसाद मिळत नसल्याने जोडणी तोडली होती.

भूम (जि. उस्मानाबाद) : वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यरत असताना एका वीज कर्मचाऱ्याने थकबाकीपोटी जोडणी तोडल्याने त्यास मारहाण झाल्याची घटना ६ वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात अंतिम सुनावणी ८ मार्च रोजी होऊन आरोपीस दोषी ग्राह्य धरत भूमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

वाशी येथील तांदूळवाडी रोडवरील महावितरण कार्यालयात विनोद दिगंबर ससाणे हे २०१५ साली वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी वाशी येथीलच श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यांच्याकडे असलेल्या वीज देयकाच्या थकबाकीपोटी प्रतिसाद मिळत नसल्याने जोडणी तोडली होती. यामुळे चिडलेल्या श्रीधर चेडे याने महावितरण कार्यालयात जाऊन विनोद ससाणे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती.

याप्रकरणी ससाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांमध्ये आरोपी श्रीधरवर शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस नाईक विजय सुंटनुरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर यावर सुनावण्या सुरू झाल्या. हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्या. आर.पी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणीला आले. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. न्यायालयासमोर आलेला पुरावा व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपी श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यास न्या. आर.पी. देशपांडे यांनी कलम ३५३ अन्वये दोषी धरून सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ८ मार्च रोजी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रवीण प्रकाशराव गाडे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून बाजीराव बळे यांनी काम पाहिले......... 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद