शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलाचे छत्र हरवल्याने चिमुकल्यांची होतेय उपासमार; आजीच्या खांद्यावर आहे जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 19:47 IST

६५ वर्षीय आजीच्या खांद्यावर आली पालनाची जबाबदारी

ठळक मुद्देचार घरे मागून शमविली जातेय पोटाची आग....

- बालाजी बिराजदार

लोहारा (जि. उस्मानाबाद) : वर्षभरापूर्वी वडिलांचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्तीच गेल्याने तीन चिमुकल्यांच्या पालनाची जबाबदारी आईवर येवून ठेपली. परंतु, मातेचे ममत्वही या चिमुकल्यांच्या नशिबी नव्हते, म्हणून की काय अवघ्या सहा महिन्यातच आईचेही आजारपणातून निधन झाले. त्यामुळे या मुलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी ६५ वर्षीय आजींवर आली. वाढत्या वयामुळे त्या कामधंदा करू शकत नाहीत. त्यामुळे गावातील चार घरे मागून सध्या निराधार चिमुकल्यांची भूक भागविली जात आहे. 

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सुकुमार हरीबा कांबळे यांना दोन मुलं व एक मुलगी अशी तीन आपत्य. मोठा मुलगा अवघा १८ वर्षाचा असताना त्याचे अपघातात निधन झाले. दुसरा मुलगा अमोल कांबळे हे हालाखीच्या परिस्थितीमुळे कामाच्या शोधात पत्नी, दोन मुलं व एका मुलीसह पुणे शहरात स्थलांतरित झाले. मिळेल ते काम करुन अमोल संसाराचा गाडा हाकत होते. सर्व काही बरे सुरू असतानाच साधारपणे वर्षभरापूर्वी अमोल यांचे अकाली निधन झाले. घरातील करता पुरूष गेल्याने कांबळे कुटुंब  उघड्यावर आले. त्यामुळे कुटुंबाच्या पालन-पोषणाची जबाबदारी आई लक्ष्मी यांच्या खांद्यावर आली. संकटासमोर हार न मानता त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटत होत्या. असे असतानाच अवघ्या सहा महिन्यात लक्ष्मी यांचाही आजारपणातून मृत्यू झाला अन् चिमुकले निराधार झाले.

तेव्हा प्रेमनाथ हा मुलगा ९ वर्षाचा होता. मुलगी आरती चार वर्ष तर अथर्व हा अवघ्या सहा महिन्याचा होता. आई-वडीलांच्या अकाली निधनामुळे चिमुकल्यांच्या पोषणाची जबाबदारी आजी सुकुमार कांबळे यांच्यावर आली. त्यांचे सध्या ६५ वर्ष एवढे वय आहे. वाढत्या वयामुळे त्यांना मोलमजुरीची कामे होत नाहीत. त्यामुळे निराधार चिमुकल्यांचे पोषण करणे कठीण झाले आहे. गावातील चार घरे मागून मिळेल त्या अन्नावर मुलांची भूक भागवित आहेत. काहीवेळा मुलांना अर्धपोटी झोपावे लागते, असे आजी सुकुमार कांबळे सांगतात. अनेकवेळा ग्रामस्था मदतीसाठी धावून येतात. परंतु, अशी मदत कुठपर्यंत पुरेल? असा सवालही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पोटाची भूक भागविण्यासाठी धडपडणाऱ्या चिमुकल्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कानेगाव येथील सुकुमार कांबळे या आजीवर तीन मुले संभाळण्याची जबाबदारी आली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आजींचे वाढते वय लक्षात घेता, मुलांचे पोषण अन् शिक्षणाची कायमस्वरूपी सोय होणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. -सतीश कदम, समन्वयक, हॅलो मेडिकल फाऊंडेशन.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFamilyपरिवार