शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपूर्वी लुटलेल्या ‘एटीएम’वर पुन्हा डल्ला; आठ लाखांची राेकड लांबविली

By बाबुराव चव्हाण | Updated: January 30, 2024 18:39 IST

चोरट्यांनी मशीन ताेडण्यासाठी गॅस कटरचा केला वापर

बलसूर (जि. धाराशिव) : बॅंकेच्या समाेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून चाेरट्यांनी एटीएम मशीन फाेडून सुमारे ८ लाखांची राेकड लंपास केली. ही घटना ३० जानेवारीच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उमरगा तालुक्यातील बलसूर येथे घडली. तीन महिन्यापूर्वीही हेच एटीएम मशीन लुटले हाेते. या घटनेचा छडा लागलेला नसतानाच पुन्हा डल्ला मारून चाेरट्यांनी पाेलिसांना आव्हान दिले आहे.

उमरगा तालुक्यातील बलसूर येथील मुख्य रस्त्यालगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. मंगळवारी पहाटे अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चाैघा चाेरट्यांनी चारचाकी वाहन ‘एटीएम’ केंद्राच्या समोर उभे करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. यानंतर मशीन असलेल्या रूममध्ये प्रवेश केला. आजुबाजुला काेणीही नसल्याची खात्री पटल्यानंतर चोरट्यांनी मशीनमधील ‘कॅश वाॅल्ट’ गॅस कटरच्या सहाय्याने कट केला. यानंतर आतील सुमारे आठ लाख रूपये एवढी राेकड चाेरटे वाहनातून पसार झाले. दरम्यान, एटीएम मशीन लुटल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उमरगा ठाण्याचे पाेनि डी. बी. पारेकर, सपाेनि नवनाथ गायकवाड, पाेह. व्ही. के. मुंडे, वाल्मिक काेळी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, ठाेस पुरावा पाेलिसांच्या हाती लागला नव्हता.

वाहन पाहून संशय बळावला...रात्रीच्या सुमारास एटीएम केंद्राच्या समाेर चारचाकी वाहन उभे हाेते. संशय आल्यानंतर गाळा मालकाने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून एटीएम केंद्राकडे पाहिले असता, आतमध्ये काही तरी ताेडण्याचा आवाज व धूर येत हाेता. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता, चाेरटे वाहनातून पसार झाले.

श्वानही घुटमळले...तीन महिन्यापूर्वी लुटलेल्या एटीएमवर पुन्हा चाेरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी दाखल हाेत पहाणी केली. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले हाेते. परंतु, श्वानासही माग गवसला नाही.

तीन महिन्यांपूर्वी २६ लाखांची लूटसाधारपणे तीन महिन्यांपूर्वी चाेरट्यांनी हेच एटीएम केंद्र फाेडून आतील २६ लाख ८८ हजार रूपये एवढी राेकड लंपास केली हाेती. या घटनेचा छडा लागलेला नसतानाच चाेरट्यांनी पाेलिसांना आव्हान देत पुन्हा याच एटीएम केंद्राची लूट करीत ८ लाख रूपये लंपास केले.

टॅग्स :atmएटीएमRobberyचोरीOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी