शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रचार सभांमधून 'कार्टून स्ट्राईक'; प्रचाराची पातळी पहिल्याच टप्प्यात घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:58 IST

उमेदवारांवर वैयक्तिक टीका हेच लक्ष्य

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीचा आखाडा आता हळूहळू तापायला लागला आहे. सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. दरम्यान, महाआघाडी व महायुतीच्या समर्थकांनी एकमेकांवर कार्टून स्ट्राईक करीत वैयक्तिक लक्ष्य केले आहे. पहिल्याच टप्प्यातील या हल्ल्याने प्रचाराची पातळी पुढे आणखी किती घसरू शकेल, याचा अंदाज येऊ शकेल.उस्मानाबाद मतदारसंघात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या पाटील व राजेनिंबाळकर घराण्यात लढत होत आहे. नात्याने चुलत भाऊ असले तरी मागच्या पिढीपासून चालत आलेले वैर महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर व महाआघाडीचे उमेदवार राणा पाटील यांनी पुढेही तितक्याच त्वेषाने जपले आहे. कारखाना, बँक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकातून हा कट्टर विरोध जपला गेला आहे. त्यामुळेच खालीही अत्यंत चुरस लागलेली असते. इतकेच नव्हे तर मागील तीन विधानसभा निवडणुकीपासून या दोन घराण्यात आरपारची लढाई लढली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील ही 'जानी दुश्मनी' स्वाभाविकच निवडणुकीत वैयक्तिक घेतली जाते. त्यामुळे विखारी टिकेने प्रचाराची सुरुवात होते अन शेवटही. अगदी या दोघांपेक्षाही त्यांचे समर्थकच जास्त 'जाळ अन धूर' काढीत असतात.

विधानसभेत दोन वेळा या दोघांत सामना झाला असला तरी, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत हे दोघे पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. दोघांचीही उमेदवारी एकाच दिवशी जाहीर झाली अन वैयक्तिक टीकेची ठिणगी पडली. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या एका समर्थकाने ओम राजेनिंबाळकर यांच्यावरील एक कार्टून प्रसृत केले होते. तेरणा कारखान्याचे साहित्य विक्रीला काढल्याचे दर्शवून 'भंगारचोर' अशी खालच्या पातळीवरील उपाधी कार्टून मध्ये बहाल केली होती. त्यांची उमेदवारी जाहीर होताच हे कार्टून पुन्हा बाहेर पडले. सोशल मीडियावर ते जोरात फिरू लागले. या स्ट्राईकने घायाळ झालेल्या राजेनिंबाळकर समर्थकांनीही कार्टूनचेच अस्त्र बाहेर काढत राणा पाटील यांना लक्ष्य केले. पहिल्यांदा त्यांनी बँक, कारखाना व इतर काही संस्था विक्रीस काढल्याचे कार्टून बाहेर काढले. यानंतर महत्वाची पदे आपल्याकडेच ठेवून घेत कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे आदेश देतानाचे कार्टून प्रसृत केले गेले. एकूणच पहिल्या टप्प्यात सुरू झालेले हे 'कार्टून स्ट्राईक' निवडणूक कुठल्या दिशेने नेणार, याची प्रचिती देणारे ठरत आहे.

'विकास' पुन्हा हरवणार?वैयक्तिक उणीदुणी वरच भर ठेवण्याची उस्मानाबादेतील प्रचाराची परंपराच राहिली आहे. विकासाचे मॉडेल तयार करण्याचा किंबहुना तो किमान प्रचारात समजून सांगण्याचाही प्रघात नाही. नव्या दमाची पिढी ही परंपरा पुसून विकासाच्या  गप्पा मारतील, बाहेर जाणारे बेरोजगार तरुणांचे लोंढे थांबवतील, अशी आशा अजूनही आहे. मात्र, त्यांच्या हुल्लडबाज समर्थकांना आवरणार कोण? हा ही मोठाच प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९osmanabad-pcउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना