महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यात आदर्श प्रभागसंघ विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत समुदाय संचलित संनियंत्रित, स्वायत्त, आर्थिकदृष्ट्या स्वायत्त व शाश्वत प्रशिक्षण संस्था विकसित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व प्रभागसंघ व ग्रामसंघांचे प्रतिनिधी तसेच अल्ताफ जिकरे, जिल्हा व्यवस्थापक, संस्था बांधणी व क्षमता बांधणी, समाधान जोगदंड, ज्ञान प्रबोधिनीच्या श्रुती पाठक, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तालुका अभियान कक्षातील अमोल कासार, प्रणिता कटकदौंड, नरेंद्र गवळी, अविनाश चव्हाण, प्रीतम बनसोडे, शिवशंकर कांबळे, अंतेश्वर माळी व प्रभागातील समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभागसंघ व्यवस्थापक आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले, तर आभार अलंकार बनसोडे यांनी मानले.
हराळीत समुदाय संचलित प्रशिक्षण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST