शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात खलबत घालून पत्नीची हत्या; पतीस जन्मठेपेची शिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:57 IST

कर्नाटकातील चडचण येथील मूळचा रहिवासी असलेला हनुमंत कुºहाडे हा कामानिमित्त उमरगा येथील आडत लाईन भागात पत्नी यल्लाबाई व दोन मुलांसह वास्तव्यास होता़

उमरगा (जि़उस्मानाबाद) : किरकोळ कारणावरुन डोक्यात खलबत घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी एकास उमरग्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ शिवाय, आरोपीस ६ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला़

कर्नाटकातील चडचण येथील मूळचा रहिवासी असलेला हनुमंत कुºहाडे हा कामानिमित्त उमरगा येथील आडत लाईन भागात पत्नी यल्लाबाई व दोन मुलांसह वास्तव्यास होता़ दरम्यान, हनुमंत यांच्या गावाकडील नातेवाईक त्यास सासरगावी राहत असल्याच्या कारणावरुन हिणवत होते़ यावरुनच पती-पत्नीत वादावादी सुरु झाली़ आरोपी हनुमंतचे भाऊही यल्लाबाई यांच्याशी या कारणावरुन भांडत असत़ दरम्यान, १ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते़ यावेळी हनुमंतचे सासरे गोपाळ धोत्रे यांनी समजूत काढून भांडण मिटविले होते़ यानंतरही दुसऱ्याच दिवशी आरोपी हनुमंत याने यल्लाबाई स्वयंपाक करीत असताना तिच्या केसाचे बखोट धरुन दुसऱ्या खोलीत घेऊन गेला़ याठिकाणी त्याने लोखंडी सळईने यल्लाबाईच्या चेहऱ्यावर वार केला़ या वारामुळे ती खाली पडताच हनुमंतने शेजारीच असलेला खलबत घेऊन तो डोक्यात घालत यल्लाबाईचा निघृण खून केला़

यासंदर्भात उमरगा ठाण्यात गोपाळ धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी करुन उमरग्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़ सुनावण्यांमध्ये सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़संदीप देशपांडे यांनी सात साक्षीदार तपासले़ यामध्ये मयत महिलेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला मुलगा गोविंद कुºहाडे तसेच तपास अधिकारी सुशिला कोल्हे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली़ या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे, अ‍ॅड़देशपांडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरीत अतिरिक्त सत्र न्या़एस़बी़ साळुंखे यांनी आरोपी हनुमंत कुºहाडे यास दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ शिवाय, ६ हजार रुपयांचा दंडही ठोठावला़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLife Imprisonmentजन्मठेपOsmanabadउस्मानाबादCourtन्यायालय