शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Killari Earthquake : शरद पवारांच्या जगण्याला भूकंपग्रस्तांमुळेच बळ मिळाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 17:19 IST

पवारांकडून प्रथमच स्वतःच्या कर्करोग आजारावर उघड भाष्य

सचिन जवळकोटे

बलसूर, ( जि. उस्मानाबाद ) : 'पंचवीस वर्षांपूर्वी भूकंपानंतर केलेल्या माझ्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील भूकंपग्रस्तांनी सोहळा आयोजित केला असला तरी मीच उलट सर्वांचं आभार मानतो; कारण त्यावेळी भूकंपग्रस्तांनी दाखवलेली जगण्याची उमेद मलाही माझ्या संकटात सामना करण्यासाठी बळ देऊन गेली. भूकंपग्रस्तांमुळेच उलट मला जगण्याचे बळ मिळाले,' अशा भाषेत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, त्यांच्या दाढेच्या कर्करोग आजारावर त्यांनी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे भाष्य केलं.

30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्या वेळचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी काही दिवस या ठिकाणी मुक्काम ठोकून भूकंपग्रस्तांना ज्या पद्धतीने धीर दिला होता, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली होती. त्या प्रती भावना व्यक्त करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाठीमागे भल्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, 'तुमच्यामुळेच जगण्याचे बळ मिळाले !' त्या खाली फोटो होता शरद पवारांचा. बाजूला शिवराज पाटील-चाकूरकर, पद्मसिंह पाटील अन् विलासराव देशमुख यांचे फोटो होते.

सोहळ्यात सर्वच वक्त्यांनी भूकंपग्रस्त भागात शरद पवारांनी केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. शेवटी पवारांचे भाषण सुरू झाले. मात्र, त्यांनी अत्यंत भावनिक होत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संकटाला प्रथमच जगजाहीर केलं. 2004 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना डॉक्टरांनी त्यांना दाढेचा कॅन्सर असल्याचं निदान केलं होतं. ती आठवण शरद पवार सांगत असताना मंडपातलं अवघं वातावरण जणू स्तब्ध झालं, 'डॉक्टरांनी त्यावेळी माझ्यावर शस्त्रक्रिया केली. काही दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. सकाळी-संध्याकाळी सीनियर डॉक्टर असायचे. दुपारी एक जुनियर डॉक्टर होता. पण एके दिवशी बोलता-बोलता त्यानं एके दिवशी मला सांगितलं की तुम्ही फक्त सहा महिन्यांचेच आहात. तेव्हा वाटणी-बिटणी काय करून घ्यायचं असेल तर करून घ्या. हे ऐकून मी उलट त्याला विचारलं, तुझं वय किती ? डॉक्टरनं सांगितलं 28. तेव्हा मी त्याला म्हणालो, तुमच्या वयाच्या दुप्पट मी जगणार. अन् त्यावेळी तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा. कारण ज्या आत्मविश्वासानं मी बोलत होतो, ती जगण्याची उमेद मला भूकंपग्रस्त भागातील लोकांनी पंचवीस वर्षांपूर्वीच दिली होती. एकाच घरातील सातपैकी सहा माणसं ढिगाऱ्याखाली दगावली, तरीही वाचलेला एकटा माणूस आजपर्यंत ज्या जिद्दीनं जगत आलाय, तेच माझ्या जगण्याचंही बळ ठरलंय.'

पवार आपल्यावर येऊन गेलेल्या संकटाची माहिती देत असताना त्यांच्या पाठीमागच्या पॅनलवर एक वाक्य मोठ्या दिमाखानं झळकत होतं, 'तुमच्यामुळेच जगण्याचे बळ मिळाले !' ते वाचताना अन पवारांना अनुभवताना अनेकांच्या डोळ्यासमोर एक वेगळंच वाक्य तरळून गेलं, ते म्हणजे.. 'भूकंपग्रस्तांमुळेच शरद पवारांच्या जगण्याला बळ मिळाले !'

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKillari Earthquakeकिल्लारी भूकंप