उस्मानाबाद : कोरोनाबाधिताला अधिक स्टेराॅईडचा वापर केल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांला कोरोनाची लक्षणे आढळताच डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे असल्याचे किडनी तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितले.
गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाने थैमान घातले असले तरी सद्य:स्थितीत कोरोना महामारीची लाट ओसरू लागली आहे. किडनीचा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यास त्याने वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्यावर इतर रुग्णांप्रमाणेच औषधोपचार केला जातो. वेदनाशामक गोळी त्यास देता येईल. ज्यांना रेमडेसिविर द्यावे लागते त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. इतर कोरोनाबाधितांप्रमाणे किडनीच्या रुग्णांनीही स्वत: ची काळजी घेणे गरजेचे आहे. किडनीच्या रुग्णास त्रास होऊ लागल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील होणारे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.
किडनीचा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यास
किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
त्यामुळे अशा रुग्णांना कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी लक्षणे आढळताच तपासणी करावी.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आपणाला किडनीचा आजार असल्याची माहिती द्यावी. त्यानुसार औषधांचा डोस कमी करता येतो.
फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेराॅईड
किडनीचे आजार असलेल्या रुग्णाने नियमित औषधोपचार घेणे गरजेचे असते.
अन्यथा किडनी फेल होण्याची शक्यता असते. जर बाधिताला स्टेराॅईड घेण्याची गरज पडल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच स्टेराॅईड घ्यावे, अन्यथा किडनीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे करा
किडनीच्या रुग्णास जास्त प्रमाणात वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनानाशक गोळी घेता येईल. वेदना बरोबर ताप असेल तर तापाची गोळीही घेतल्यास योग्यच राहील.
हे करू नका
किडनीच्या रुग्णांने खासगी उपचार करणे योग्यच नाही. खासगी उपचार केल्यास दुसराच त्रास उद्भवण्याची शक्यता असते. वेळीच किडनी तज्ज्ञ व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला हा त्या रुग्णाला फायद्याचा आहे.
कोट...
किडनी आजाराबाबत काही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांकडे गेल्यास किडनीचा त्रास होत आहे, हे आवर्जून सांगावे. म्हणजे त्या रुग्णावर योग्य ते उपचार करता येतील. किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी पेनकिलर, अँटीबॉडीज गोळ्या घेणे धोक्याचे ठरू शकते. स्टेरॉईडमुळे मधुमेहाचे आजारही वाढले आहेत.
डॉ. प्रशांत पाटील, किडनी विकार तज्ज्ञ
पाॅईटर
कोरोनाचे एकूण रुग्ण ५७००८
बरे झालेले रुग्ण ५५०७७
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ५९२
मृत्यू १३३९