शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 25, 2022 12:49 IST

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे.

उस्मानाबाद : पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी धाड टाकली आहे. मागील ६ तासांपासून येथील कागदपत्रांची छाननी पथक करीत आहे. दरम्यान, त्यांच्या नांदेड येथील कारखाना व पंढरपुरातील घरातही तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. कोविड काळात देशातील पहिला ऑक्सिजन प्लँट उभा करण्याचा मान या कारखान्याने मिळवला होता. पाटील यांचा नांदेड येथेही साखर कारखाना आहे. नुकतेच त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पंढरपूरच्या विठ्ठल कारखानाही ताब्यात घेतला आहे. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिल्ली व पुणे येथील आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांचे एक पथक पोलिसांसह अचानक धाराशिव कारखान्यावर धडकले. लागलीच त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत येथील कागदपत्रांची छाननी सुरु केली. याचवेळी कारखान्यातील सर्व कर्मचार्यांना एकत्र वेगळ्या हॉलमध्ये थांबण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मागील जवळपास ६ तासांपासून हे पथक कारखान्यावरच ठाण मांडून आहे. तपासणीअंती त्यांच्या हाती काय लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कृषी शिबीराचे स्टीकर लावून आली वाहने...आयकर विभागाच्या या छाप्याबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात आली होती. स्थानिक अधिकार्यांनाही याबाबतची कुणकूण लागू देण्यात आली नाही. समोरच्या काचेवर कृषी अभ्यास शिबीर, असे स्टीकर लावलेली पुणे पासिंगची दोन वाहने भल्या सकाळीच कारखान्यावर दाखल झाली. त्यातून दहा अधिकारी व पोलीस उतरले व त्यांनी कार्यालयाचा ताबा घेत तपासणी सुरु केली.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडOsmanabadउस्मानाबाद