शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

उस्मानाबादेत हायव्होल्टेज लढत, ११ वाजेपर्यंत केवळ १७ टक्के मतदान

By चेतनकुमार धनुरे | Updated: May 7, 2024 11:42 IST

दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाला फारशी गर्दी झाली नाही. यामुळे ९ वाजेपर्यंत केवळ ५.७९ टक्के इतकेच मतदान नोंदवले गेले आहे. दरम्यान, यानंतर मात्र मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पहायला मिळाली. 

११ वाजेपर्यंत सुमारे १७.०६ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. सकाळी ११ वाजता उन्हाचा पारा ३७ अंशावर पोहोचला होता. दुपारी १ ते २ वाजेदरम्यान तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे मतदानाचा टक्का या वेळेत कमी राहण्याचीही शक्यता आहे.

भीमनगरातील मतदान यंत्र बिघडले...धाराशिव शहरातील भीम नगर भागातील मतदान केंद्रावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मतयंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. मतदान केल्यानंतर आवाज येत नसल्याने केंद्राध्यक्षांनी दुसऱ्या मशिनची मागणी नोंदवली.जवळपास अर्धा तास यामुळे मतदान ठप्प होते.

उस्मानाबाद मतदारसंघात ३१ उमेदवारमागील २० दिवस चाललेल्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आज मतदानाला सुरुवात झाली. येथे लोकसभेसाठी ३१ उमेदवार उभे आहेत. या सर्व उमेदवारांचे भविष्य मतदार मतयंत्रात आज सील करतील. यानंतर थेट ४ जूनलाच मतदारांचा कौल समोर येणार आहे.

हायव्होल्टेज लढत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडीसह विविध प्रादेशिक पक्ष-संघटनांचे व अपक्ष असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात यावेळी १९ लाख ९२ हजार ७३७ मतदारांची नोंद झालेली आहे. यापैकी पहिल्यांदाच मतदान करीत असलेले २९ हजार ८१९ नवमतदारही नोंदले गेले आहेत. निवडणूक आयोगाने यावेळी ८५ वर्षे वयावरील व दिव्यांग मतदारांसाठी घरून मतदानाची सोय केली होती. २ ते ५ मे या कालावधीत त्यांचे मतदान झाले आहे. जवळपास ९४ टक्के मतदान त्यांचे नोंदविले गेले आहे.

६ मतदान केंद्र संवेदनशीलदरम्यान, मतदारसंघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा, बार्शी या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात एकूण २ हजार १३९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील ६ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या सर्वच मतदान केंद्रांवर सुमारे १० हजार अधिकारी-कर्मचारी, पोलिस नियुक्त आहेत. 

दिवसभरात ४३ अंश तापमानाचा अंदाजउमेदवारांची संख्या ३१ असल्याने यावेळी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागत आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. दिवसभरात कमाल ४३ अंश तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने सकाळच्या सत्रातच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४osmanabad-pcउस्मानाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४