शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने जमिनी खरडून गेल्याने शंभर एकर क्षेत्र राहणार पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:13 IST

पुराचे पाणी शेतात घुसून ओढ्याकाठच्या, तलावाच्या सांडव्याशेजारील जमिनी अक्षरश: खरडून गेला.

ठळक मुद्दे१४ आक्टोबर रोजी तामलवाडी भागात अतिवृष्टीचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला.

तामलवाडी (जिल्हा उस्मानाबाद)  : मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीवेळी पुराच्या तडाख्याने ओढ्या काठच्या जमीनी खरडुन गेल्याने त्या आता नापिक बनल्या आहेत. त्यामुये यंदाच्या रबी हंगामात या भागातील जवळपास १०० एकर पेरणी विना राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१४ आक्टोबर रोजी तामलवाडी भागात अतिवृष्टीचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. पुराचे पाणी शेतात घुसून ओढ्याकाठच्या, तलावाच्या सांडव्याशेजारील जमिनी अक्षरश: खरडून गेला. यामुळे सांगवी, सुरतगांव तामलवाडी देवकुरुळी वडगांव कदमवाडी पिंपळा बु शिवारातील शेतातील माती घासून जमीन नापीक बनली. सध्या बहुतांश जमिनीवर खड्डे , अन्‌ दगड-गोटे शिल्लक आहेत. घासून गेलेला गाळ पुन्हा कुठून व कसा भरायचा? यासाठी पैसा कसा उभा करायचा, असे प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहेत. शिवाय पुराच्या पाण्याने जमिनीसोबतच विहरीचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांचे बांध फूटले असून, शंभरावर विहरी गाळाने बुजल्या आहेत. त्यामुळे जमीन दुरूस्तीसाठी शासनाने मदत करण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

जनावराच्या आजाराचे प्रमाण वाढलेतामलवाडी भागात पाळीव जनावरांच्या आजाराच्या प्रमाणात वाढ. होत आहे. संसर्गजन्य आजाराचा फैलाव उपचारानंतर कमी होत नसल्याने पशुपालक चिंताग्रस्त आहेत. लम्पी स्किनसदृश्य आजारानेही अनेक जनावरे त्रस्त आहेत. ऐन रबी पेरणीच्या मोसमात बैलाना आजार जडत असल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभारले आहे

विहीर नुकसानीच्या २५ तक्रारीअतिवृष्टीच्या पुराचे पाणी ओढ्या काठच्या विहिरीत शिरल्याने त्या गाळाने भरल्याच्या तक्रारी २५ शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याशिवाय जमीन खरडून झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील वरिष्ठांनी मागवून घेतल्यास तो सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी सहाय्यक आर. पी. संकपाळ यानी दिली.

शेतकऱ्यांना भरीव मदत करावीनुकसानीपोटी शासनाने हेक्टरी अनुदान जाहीर केले. परंतु, जमीन पुराच्या पाण्याने खरडून जाऊन विहीर व बोअर देखीलगाळाने बुजले आहे हे नुकसान नाही का यासाठी यंदा रबी हंगामात खरडुन गेलेल्या जमिनीत पेरणी करता येत नाही. यामुळे जमिनी नापीक बनल्या असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याना भरीव मदत करावी.- नागनाथ मुरलीधर मगर, शेतकरी, सांगवी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस