शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 17:27 IST

तरुणाने मरणोत्तर केले नेत्रदान; मुलींनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमले, पण तोपर्यंत उशीर झाला होता

तेर (जि. धाराशिव) : शेततळ्यात पोहत असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगळजवाडी शिवारात सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत्यूनंतर या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या नेत्रदानाचा निर्णय घेतल्याने तेर येथील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले.

धाराशिव तालुक्यातील वाणेवाडी येथील दयानंद अनंता घुटूकडे (३४) हे सोमवारी हिंगळजवाडी शिवारातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी सोबत आपल्या दोन लहान मुली व शेजारील मुलींनाही नेले होते. पोहण्यासाठी शेततळ्यात उतरल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसल्याने दयानंद हे पाण्यात बुडाले. मुलींनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी या ठिकाणी जमा झाले. त्यांनी लागलीच गावकऱ्यांनाही याची माहिती कळविली. घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांनी दयानंद यांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दयानंद यांचा मृतदेह तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी गावकरी व मृताच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन दयानंदचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथे डॉ. गोविंद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. आयुब शेख, समन्वयक उमेश गोरे यांनी नेत्र काढून धाराशिव येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द केले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोठावळे यांनी शवविच्छेदन केले. दयानंद घुटूकडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे. दयानंद यांच्या पार्थिवावर वाणेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बसविला होता जमदयानंद घुटूकडे हे अत्यंत सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या परिवारातील होते. प्रवासी वाहनांवर काम करून पै-पै जोडत ते ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात उतरले. हा व्यवसाय चांगला चालल्याने अल्पावधीत तेर-पुणे मार्गावर त्यांनी चार ट्रॅव्हल्स सुरू केल्या होत्या. दयानंद तेर येथून तर त्यांचा भाऊ पुण्यातून हा व्यवसाय पाहत होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdrowningपाण्यात बुडणे