उस्मानाबाद : आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांत प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगतातून या महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.
विवेकानंद युवा मंडळ
फोटो (२३-१) बाळकृष्ण साळुंके
उस्मानाबाद : येथील विवेकानंद युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रस्ता सुरक्षा सप्ताहाची’ शपथ देण्यात आली. यावेळी स्वप्नील देशमुख, सलमान सय्यद, रोहन गाढवे, रवी सुरवसे, विजय कोळगे, प्रशांत मते, श्याम वाघमारे, वैभव लांडगे आदी उपस्थित होते.
तेर ग्रामपंचायत
फोटो (२३-१) सुमेध वाघमारे
तेर : येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शिंपले, रविराज चौगुले, मंगेश पागरकर, इर्शाद मुलाणी, बापूराव नाईकवाडी, अमोल थोडसरे, विठ्ठल कोकरे, केशव वाघमारे आदी उपस्थित होते.
दाळिंब ग्रामपंचायत
फोटो (२३-१) देवीसिंग राजपूत
येणेगूर : दाळिंब ग्रामपंचायत कार्यालयात बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस जयंती व स्वराज्य संकलपक शहाजी राजे भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी या तीन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी भास्कर वैराळे, हिराजी पाटील, खय्युम चाकूरे व नवनिर्वाचित सदस्य, नागरिक उपस्थित होते. ग्राविकास अधिकारी वैराळे यांनी या महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
जयप्रकाश विद्यालय
फोटो (२३-१) अनिल लोमटे
उस्मानाबाद : तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयात डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य रामदास कोळगे, शिवसेना तालुका उपप्रमुख राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, प्रा. जयप्रकाश कोळगे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिवकन्या साळुंके, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के.ए. डोंगरे, स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन कांबळे व विनय सारंग यांनी केले, तर आभार गणेश शेटे यांनी मानले.
विद्यानिकेतन आश्रमशाळा
फोटो (२३-१) गणेश कुलकर्णी
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख आर.बी. पाटील, ए.एन. शेख (पर्यवेक्षक), एस.एस. कुंभार, एस.के. बडदापुरे, के.आर. पडवळ, डी.डी. खबोले, जाधव, व्यवहारे व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
भारत विद्यालय
उमरगा : येथील भारत विद्यालयात मुख्याध्यापक शाहुराज जाधव, पर्यवेक्षक विक्रांत मोरे, संजय देशमुख आदींच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’, अशी घोषणा करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अद्वितीय असे मानावे लागेल, असे प्रतिपादन मुख्याध्यापक शाहुराज जाधव यांनी केले.
येडशी ग्रामपंचायत
फोटो (२३-१) दत्ता पवार
येडशी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, सरपंच गोपाळ नागटिळक, विभागप्रमुख विनोद पवार, संजय पाटील, ग्रा.पं. सदस्य अमर पवार, गजानन नलावडे, सुनील शेळके, बालाजी देशमुख, राजाभाऊ देशमुख, दत्तात्रय देशमुख आदींसह ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.
जागजी ग्रामपंचायत
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात अप्पासाहेब पाटील, नानासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडण्यात आले. यावेळी अण्णासाहेब तनमोर, माजी उपसरपंच बालाजी सावंत, रणधीर पाटील, वैजिनाथ सावंत, जोतीराम शेरखाने, बापू बनसोडे, चंद्रकांत माळी, अप्पा भालेकर, समाधान माने, ग्रामसेवक सचिन वाघे आदी उपस्थित होते.
पाथरूडमध्ये शालेय साहित्याचे वाटप
फोटो (२३-१) बाबू खामकर
पाथरूड : येथे मध्यवर्ती बसस्थानक याठिकाणी प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बलभीम भसाड, बप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच भाऊराव काटे विद्यालय येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, शिवसेना विभागप्रमुख गजेंद्र खुने, तात्यासाहेब बोराडे, मुख्याध्यापक नाईकदे, ग्रामपंचायत सदस्य अशोक भसाड, बप्पा पवार, शिवाजी फाळके, युसूफ तांबोळी, शिवाजी टिकते, रामलिंग टिकते, समाधान दळवे, सचिन चौधरी, राजेंद्र वाडेकर, अनिल टिकते, भाऊसाहेब बोराडे, जीवन बोराडे, विलास भसाड, दत्ता पवार, बालाजी पवार, अनंत बोराडे, राज भूषण बोराडे, आकाश तिकटे, नारायण पखाले, प्रशांत गिरी, बंडू जोशी आदी उपस्थित होते.