शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अफवांतून घडणाऱ्या हिंसाचारास सरकारच जबाबदार; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:03 IST

गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अ‍ॅड. आंबेडकर यांनी संवाद साधला़

उस्मानाबाद : अफवांमुळे राज्यभर घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटना माणसातील माणूसपण संपत चालल्याची प्रतिके आहेत़ गेल्या चार वर्षांत ज्या दंगली, घटना घडल्या, त्यातील क्रुरता यापूर्वी कधीही पाहिली नव्हती़ त्यामुळेच माणसातील सैतान जागे करण्यास आणि अशा हिंसाचारास सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे केला़

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी, ओबीसी, मुस्लिम समाजाशी मंगळवारी अ‍ॅड़आंबेडकर यांनी संवाद साधला़ यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर त्यांनी हल्ला चढविला़ ते म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमविरोधी राजकारण करीत आहेत़ मुस्लिम समाजाविनाही सत्ता आणू शकतो, हे रुजविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देशात चालला आहे़ व्यापारी, मुस्लिम समाज, राजकीय विरोधक यांच्यात वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करणे व राज्य करणे, हा केंद्र व राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केला़

आपण वंचितांची मूठ बांधत असताना मला इतरांना का जागे करताय? तुम्ही दलितांचेच राजकारण बघा, असा सल्ला मिळू लागला आहे़ मात्र, मी कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नाही, असेही आंबेडकर म्हणाले़ बड्या उद्योजकांवर सरकारची चांगलीच मेहेरनजर आहे. अनिल अंबानींच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीस १०० लढाऊ विमानांचे कंत्राट कोणत्या आधारावर दिले? हे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले़ 

पक्षनिधीची चौकशी व्हावी भाजपच्या पक्ष निधीत अचानक ५०० कोटी रुपये वाढतात़ ते कोणत्या उद्योजकाने दिले, याचा खुलासा व्हावा़ जेणेकरुन त्या उद्योजकाला सरकारने याबदल्यात काय दिले, हेही समोर येईल़ निवडणूक आयोगाने पक्षनिधीची चौकशी करुन ‘दूध का दूध़़’ करावे, अशी मागणी  आंबेडकर यांनी केली़

अदानीच्या तुरीसाठी शेतकरी सुळावऱ देशातील बडे उद्योजक अदानींनी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात तूर, खरेदी केली होती़ ही तूर देशांतर्गत बाजारपेठेत विक्री व्हायची असल्यानेच सरकार शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत नसल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरGovernmentसरकारPoliticsराजकारण