शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'एसटी कर्मचार्‍यांना न्याय द्या'; प्रलंबित मागण्यांसाठी वाहकाचे टॉवरवर चढून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:33 IST

गळ्यात गळफास अडकवून सुरू केले वाहकाने आंदोलन 

कळंब ( उस्मानाबाद ) :एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी कळंब आगारातील वाहक सच्चिदानंद पुरी यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक शहरातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून, गळ्यात गळफास अडकवून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

एसटी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबीत मागण्यासाठी मागच्या काही महिन्यात झालेल्या आंदोलनात कळंब आगारातील कर्मचारी अग्रस्थानी होते. आमरण उपोषण, अन्नत्याग अशा कळंब आगार ते मुंबईपर्यंत झालेल्या आंदोलनात येथील काही कर्मचाऱ्यांचा सक्रीय सहभाग होता. दरम्यान, बुधवारी कळंब आगारातील वाहक सच्चिदानंद पुरी यांनी भल्या सकाळी शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील मोबाईल टॉवर गाठले. सोबतील दोरखंड पण घेतलेला होता. यानंतर टॉवरची एक एक पायरी कापत मोठ्या उंचीवर पोहचत एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. सदर कर्मचार्‍यांनी यापूर्वी पण कळंब येथे आगाराच्या प्रवेशद्वारावरील झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. 

स्वतःच व्हिडीओ केला व्हायरल...यावेळी आंदोलक सच्चिदानंद पुरी यांनी टॉवरवर उंच ठिकाणी बसल्यानंतर गळ्यात गळफास अडकवलेल्या स्थितीत एक व्हिडीओ तयार करून व्हायरल केला आहे. यामध्ये कर्मचारी, त्यांचे प्रश्न व आपल्या मागणीचा उहापोह केला आहे. 

वरिष्ठ अधिकारी दाखल...एरव्ही वर्दळ नसलेल्या बीएसएनएलच्या परिसरात पुरी यांच्या आंदोलनामुळे बघ्याची गर्दी वाढली आहे. पोलिस दाखल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशीव विभागाच्या विभाग नियंत्रक चेतना शिरवाडकर, आगार प्रमूख मुकेश कोमटवार घटनास्थळी ठाण मांडून आंदोलक पुरी यांच्याशी चर्चा करत होते. 

काय आहे व्हिडीओतील संवाद... खूप दुख वाटतेय, गेल्या दिड वर्षापासून विलिनीकरणाचा लढा लढत आलोत. जवळपास १२४ कर्मचार्‍यांचा यात गमावले. धूर्त राजकारण्यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या लढ्याचा दुरुपयोग केला, राजकीय पोळी भाजून घेतली. यामुळे एसटी कर्मचार्‍यांना न्याय देवू न शकल्याने मी खचून गेलो आहे. सरकार, धोरणकर्ते व आमच्यातील काही संघटना यांच्यात काय चाललंय ते दिसून येते. यामुळे एसटी कर्मचार्‍यांना माणसांत बसण्यासाठी गरजेचं असलेल्या सातव्या वेतन आयोग व राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचार्‍यांना वेतन द्यावे' असे आंदोलक सच्चिदानंद पुरी यांनी व्हिडीओ व्हायरल करून स्पष्ट केले आहे

टॅग्स :state transportएसटीOsmanabadउस्मानाबाद