जुगार खेळणाऱ्यांना ३०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:45+5:302021-03-06T04:30:45+5:30

मुलीचा पाठलाग करून विनयभंग उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका खेडेगावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नळावर पाणी भरताना तसेच शाळेत जात ...

Gamblers fined Rs 300 | जुगार खेळणाऱ्यांना ३०० रुपयांचा दंड

जुगार खेळणाऱ्यांना ३०० रुपयांचा दंड

googlenewsNext

मुलीचा पाठलाग करून विनयभंग

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका खेडेगावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नळावर पाणी भरताना तसेच शाळेत जात असताना गावातीलच चार तरुणांनी शिट्या वाजवून टवाळी केली. तसेच ती घरासमोर थांबलेली असताना याच तरुणांनी हाताला धरून ओढत नेण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईलचोर अडकला जाळ्यात

उस्मानाबाद : अनाळा येथील ईश्वर आण्णाराव ईटकर हे आपला मोाबईल फोन उशाला ठेऊन घराच्या ओट्यावर झोपले असताना त्यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने काही दिवसांपूर्वी पळविला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सावधरवाडी येथील आरोपी धीरज कांतीलाल पवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचा मोबाईल जप्त केला आहे.

तीन जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

उस्मानाबाद : उमरगा पोलिसांनी गुरुवारी मटका जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. यात बसस्थानकाजवळ थांबून जुगार खेळत असलेल्या मलाप्पा व्हसोदोड्डी, बशीर काशिम शेख (रा.उमरगा) यांना ताब्यात घेत १ हजार ३३० रुपये जप्त केले. तर दुसऱ्या कारवाईत ज्ञानेश्वर भीमराव पवार (रा.बलसूर) यास ताब्यात घेऊन १ हजार २७० रुपये जप्त करीत गुन्हा दाखल केला.

Web Title: Gamblers fined Rs 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.