शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ वाढतेय, मग साखरेचा ‘एमएसपी’ का नाही? साखर उत्पादक संघटनांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: July 20, 2024 18:36 IST

पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व नवी दिल्ली येथील इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची (इस्मा) पुण्यातील साखर संकुलात नुकतीच संयुक्त बैठक झाली.

कळंब (जि. धाराशिव) : साखरेची विक्री किंमत अर्थात ‘एमएसपी’ २०१९ पासून ३१ रुपये प्रतिकिलो आहे. तुलनेत उसाची ‘ एफआरपी’ मात्र दरवर्षी वृद्धिंगत होत जाऊन यंदा ३४०० रुपये प्रतिटन झाली आहे. यामुळे कारखान्यांना नगदी तोटा सहन करावा लागत असल्याने साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करून ‘एफआरपी’ किमतीशी ‘एमएसपी’ संरेखित करण्यासाठी एक सूत्र निश्चित करावे, अशी मागणी ‘विस्मा’ व ‘इस्मा’ या साखर उद्योगातील संस्थांनी केली आहे.

पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व नवी दिल्ली येथील इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची (इस्मा) पुण्यातील साखर संकुलात नुकतीच संयुक्त बैठक झाली. ‘इस्मा’चे अध्यक्ष प्रभाकर राव, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या उपस्थितीत साखर उद्योगासमोरील प्राधान्यक्रमांच्या बाबींवर चर्चा झाली. यावेळी साखरेची ‘एमएसपी’ व उसाची ‘एफआरपी’ यांचा वस्तुनिष्ठ विचार करत मागच्या पाच-सहा वर्षांत साखरेची ‘एमएसपी’ ३१ रुपये प्रतिकिलोवरच स्थिर आहे. उत्पादन खर्चावर आधारित साखरेची सरासरी किंमत रुपये ४१.६६ रुपये प्रतिकिलो आहे. यामुळे कारखान्यांना नगदी तोटा सहन करावा लागतोय, असे निवेदन भारत सरकारला सादर करण्यात आल्याचे ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व ‘इस्मा’चे अध्यक्ष प्रभाकर राव यांनी सांगितले.

या मुद्यांवर केला फोकस...१. साखरेच्या विक्री किमतीमध्ये वाढ हवी. उसाच्या ‘एफआरपी’शी ‘एमएसपी’ ‘संरेखित’ करण्यासाठी एक सूत्र तयार करणे गरजेचे.२. उसाचा रस आणि ‘बी’ हेवी मोलॅसेसद्वॉरे इथेनॉलच्या उत्पादनांवर डिसेंबर २०२३ रोजीच्या निर्बंध घालणाऱ्या अधिसूचनांमुळे इथेनॉल पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.३. यामुळे आसवनी कामकाज दिवसांवर परिणाम होऊन ते सरासरी २७० ते ३३० दिवसांच्या तुलनेत १८० दिवसांपर्यंत कमी झाले आहे. यामुळे आर्थिक समस्या तयार झाल्या.४. अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी २०२४-२५ हंगामात २० लाख टन साखर निर्यात परवानगी आवश्यक. अनिवार्य राखीव साठा, निर्यात धोरण यात कारखाना हित पाहणे गरजेचे.५. साखर विकास निधी, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्व अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यास मदत होण्यासाठी कर्जांना २ वर्षांची स्थगिती, १० वर्षांसाठीच्या हप्त्यासह व्हावी पुनर्रचना.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेOsmanabadउस्मानाबाद