कोरोनाचा संसर्ग वाढीस लागताच भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. सध्या वांगी ५ रूपये तर टोमॅटोला प्रति किलो २ रूपये दर मिळू लागला आहे. तोडणीची मजुरीही पदरात पडत नाहीये. यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. तुळजापुर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील बाळासाहेब मगर यांनी त्यामुळेच आपले शेत खुले करुन दिले आहे. त्यांनी तलावाच्या पाण्यावर १ हजार वांग्याची रोपे २० गुंठे जमिनीत तर १ हजार टोमॅटोच्या रोपाची लागवड २० गुंठे क्षेत्रात केली आहे. या भाजीपीकाचे उत्तमरित्या संगोपन त्यांनी केले. महिनाभरापासून फळधारणेस सुरवात झाली. मात्र, जसा माल बाजारपेठेत नेण्याची वेळ आली तसा कोरोनाचा संसर्गही वाढला. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव घसरले. मिळणारा भाव अन तोडणीसाठी लावलेल्या मजुराचा रोजगार याचाही ताळमेळ कुठे बसेना. त्यामुळे मंगर यांनी कंटाळून शेतातील भाजीपाला मोफत वाटण्यास सुरवात केली आहे. सांगवी व गोंधळवाडी या दोन गावातील नागरिक त्यांना लागतील तितके वांगी व टोमॅटो शेतात जाऊन घेऊन जात आहेत.
बाजारात भाव मिळत नसल्याने आतापर्यंतच्या लागवड व जोपासनेचा खर्च तर बुडालाच आहे. मात्र, आता तोडणी अन् वाहतुकीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. जागेवर या भाज्यांचे नुकसान करण्यापेक्षा चार लोकांची उदरी तरी जातील, या भावनेतून मोफत वाटपास सुरुवात केल्याचे शेतकरी बाळासाहेब मगर यांनी सांगितले.
070421\07osm_1_07042021_41.jpg~070421\07osm_2_07042021_41.jpg
भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे सांगवी काटी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी बाळासाहेब मगर यांनी दोन गावच्या नागरिकांना मोफत वाटप सुरु केले आहे.~भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे सांगवी काटी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी बाळासाहेब मगर यांनी दोन गावच्या नागरिकांना मोफत वाटप सुरु केले आहे.