शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव धरणाचे चार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 10:22 IST

Discharge of water from Sina- kolegaon Dam : मध्यरात्रीच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले

ठळक मुद्देसंभाव्य धोका लक्षात घेऊन रात्रीच धरणाचे दोन दरवाजे उचलले.बुधवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग वाढविला

उस्मानाबाद - जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगाव धरण मंगळवारी रात्रीच्या पावसाने पूर्ण भरले. यामुळे धरणाचे ४ दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे परांडा तालुक्यातील सीना-कोळेगाव धरणात  मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु होती. त्यामुळे दिवसागणिक धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मंगळवारी सायंकाळी धरण 95 टक्क्यांवर भरले होते. असे असतानाच रात्री धरण क्षेत्रात पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले. 

संभाव्य धोका लक्षात घेऊन रात्रीच धरणाचे दोन दरवाजे उचलले. मात्र पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याने बुधवारी सकाळी आणखी दोन दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादRainपाऊस