महिला गटांना चाळीस लाखांचे कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:25+5:302021-03-26T04:32:25+5:30

परंडा : तालुक्यातील रुई, भांडगांव, पिंपरखेड, खानापूर या गावामध्ये उमेद अभियान व बँक ऑफ इंडियाच्या माणकेश्वर ग्रामीण शाखेच्या ...

Forty lakh loans sanctioned to women's groups | महिला गटांना चाळीस लाखांचे कर्ज मंजूर

महिला गटांना चाळीस लाखांचे कर्ज मंजूर

googlenewsNext

परंडा : तालुक्यातील रुई, भांडगांव, पिंपरखेड, खानापूर या गावामध्ये उमेद अभियान व बँक ऑफ इंडियाच्या माणकेश्वर ग्रामीण शाखेच्या वतीने कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. यात एकूण ४० लाख रुपये कर्ज समूहांना देण्यात आले. तसेच समूहातील सदस्यांचे विमा, श्रमयोगी योजना, अटल पेन्शन आदी योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक वरूणराजे गोरे, अनुप थमूल, क्षेत्राधिकारी वाडकर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक भूषण व्यवहारे, श्रीराम टेकाळे, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक माणिक सोनटक्के, प्रभाग समन्वयक विजय गवळी, बँक सखी लिमकर, प्रेरिका महानंदा कवठे, सुनीता चौधरी, सारिका अंधारे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी - परंडा तालुक्यातील रुई येथे कर्ज मेळाव्या प्रसंगी उपस्थित बँक व्यवस्थापक वरुण गोरे, तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के व महिला.

Web Title: Forty lakh loans sanctioned to women's groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.