उर्दू हायस्कूल
उस्मानाबाद : शहरातील ख्वॉजा नगर भागातील शम्सूल उलूम उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व गुलशन ए अतफाल उर्दू प्राथमिक शाळा येथे संस्थेचे सचिव शेख लईख अहमद शब्बीर अहमद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पदाधिकारी शेख मुजीब अहेमद पठाण, अकबर काजी जुल्फीकार, मुहीब अहमद, सामाजिक कार्यकर्ते फेरोज पल्ला, प्राचार्य काजी रेशमा परविन, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. शेख शागिंद यांनी आभार मानले.
देशभक्तीपर गीत गायन
उस्मानाबाद : शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतीत स्वामी विवेकानंद केंद्रात शांतीदूत परिवार, मेलडी स्टार, संस्कार भारती, संस्कार वर्गातील सदस्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन करून स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा केला. प्रास्तविक प्रा. श्यामराव दहिटणकर यांनी केले. शांतीदूत परिवार व मेलडी स्टारबद्दल जिल्हाध्यक्ष युवराज नळे यांनी माहिती दिली. तौफिक शेख, अरविंद पाटील, धनंजय कुलकर्णी, अनिल मालखरे, रवींद्र कुलकर्णी, महेश उंबरगीकर, सुरेश वाघमारे, सुंभेकर, युवराज नळे, शेषनाथ वाघ यांच्यासह प्रगती शेरखाने हिने गीतगायन केले. कार्यक्रमात भारताचा नकाशा रेखाटून ७५व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी सामूहिक मेणबत्या प्रज्वलित करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सुनीता दहिटणकर, डुमणे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याणी वाकुरे, सत्यहरी वाघ, विशाखा बागल आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचलन शेषनाथ वाघ, आभार सार्थकी वाघ हिने मानले.