शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Video: तेरखेड्यात फटाक्यांच्या गाेडाऊनला भीषण आग; १४ कामगार बालंबाल बचावले

By बाबुराव चव्हाण | Updated: May 15, 2023 13:21 IST

गाेडाऊनमध्ये माेठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टाॅक करण्यात आला हाेता. त्यामुळे आग लागताच फटाक्यांचे आवाज हाेऊ लागले.

तेरखेडा (जि. धाराशिव) -वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाक्याच्या गाेडाऊनला आज सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आतील तेरा ते चाैदा महिला तसेच पुरूष कामगार वेळीच बाहेर पडल्याने ते बालंबाल बचावले. मात्र, एक व्यक्ती जखमी झाली असून त्यास उपचारासाठी तेरखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले आहे.

तेरखेडा येथील बसस्टॅन्डपासून अवघ्या काही अंतरावर भलेमाेठे फटाक्यांचे गाेडाऊन आहे. याच गाेडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटाके तयार करून स्टाॅक करून ठेवला जाताे. दरम्यान, याच गाेडाऊनला साेमवारी सकाळी साधारपणे पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच आतील महिला तसेच पुरूष कामगार प्रसंगावधान बाळगत गाेडाऊनबाहेर बाहेर पडले. मात्र, एक व्यक्ती जखमी झाली आहे. संबंधितास तातडीने तेरखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ताेवर धाराशिव पालिकेचे अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत संपूर्ण गाेडाऊन जळून भस्म झाले.

धुराचे लाेट अन् बघ्यांची गर्दी...गाेडाऊनमध्ये माेठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टाॅक करण्यात आला हाेता. त्यामुळे आग लागताच फटाक्यांचे आवाज हाेऊ लागले. त्यामुळे गाेडाऊन परिसरात प्रचंड धूर निर्माण झाला हाेता. आकाशात अक्षरशा धुराचे लाेट पहावयास मिळत हाेते. दरम्यान, फटाक्यांचे आवाज ऐकून ग्रामस्थांनी परिसरात माेठी गर्दी केली हाेती.

टॅग्स :fireआगOsmanabadउस्मानाबाद