शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या ५ बँक शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 13:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन तर वाशी तालुक्यातील अन्य बँकांच्या दोन शाखाधिकाऱ्यांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी गमे यांनी बुधवारी कळंब, वाशी तालुक्यात आढावा बैठक घेतली होती़ या बैठकीत पीककर्ज वाटपात दिरंगाई करीत असलेल्या बँक शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले

कळंब ( उस्मानाबाद) : जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या तीन तर वाशी तालुक्यातील अन्य बँकांच्या दोन शाखाधिकाऱ्यांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात पीककर्जाचे वाटप अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे़. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राधाकृष्ण गमे यांनी बँकांना तंबी दिली होती. त्यानंतरही पीकर्ज वाटपाची गती वाढली नाही़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी गमे यांनी बुधवारी कळंब, वाशी तालुक्यात आढावा बैठक घेतली होती़ या बैठकीत पीककर्ज वाटपात दिरंगाई करीत असलेल्या बँक शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़.

या अनुषंगाने कळंब येथील सहायक निबंधक बी़एस़ कटकधोंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय स्टेट बँकेच्या कळंब शाखेचे व्यवस्थापक कृष्णकांत मारुती काळे, अंदोरा शाखेचे महेश आनंदगावकर व मंगरुळ शाखेचे एम़व्ही़ वेदपाठक यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

वाशी तालुक्यातही गुन्हा दाखल दरम्यान, वाशी तालुक्यातही भारतीय स्टेट बँकेचे वाशी शाखेचे व्यवस्थापक अमित ओव्हाळ व बँक आॅफ  महाराष्ट्र शाखा पारगावचे शाखाधिकारी अनुज टोपो  यांच्यावर सहायक निबंधक के़एस़ बारकूल यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याशिवाय, तेरखेडा येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे बारकूल यांनी सांगितले़

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीUsmanabad policeउस्मानाबाद पोलीसUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद