शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण आणि नायगाव मंडलांमध्ये ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून, ५० टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी पीक पेरा नोंदवित होते. परंतु, शेतकऱ्यांना बँकेत किंवा इतर ठिकाणी पीक पेऱ्याच्या स्वतंत्र प्रमाणपत्राची मागणी केली जात होती. शिवाय, विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना स्वयंघोषित पीक प्रमाणपत्र जोडावे लागत होते. परंतु, यावर्षी शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या मोबाईलमधून पीक पेरा नोंदविता यावा, यासाठी ॲपची निर्मिती केली. यासाठी शिराढोण येथील मंडल अधिकारी शंकर पाचभाई आणि मंडलातील सर्व तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले. शिराढोण मंडलामध्ये एकूण ७ हजार ९७८ शेतकरी खातेदार असून, त्यापैकी ३ हजार ५४० शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-पीक पाहणी नोंदवलेली आहे. नायगाव मंडलामध्येही ८ हजार ५८२ शेतकऱ्यांपैकी ३ हजार ७२० शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर पीक पाहणी नोंदवलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालय आणि सर्व तलाठी कार्यालयाकडून कडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.
चौकट.....
३० सप्टेंबरपर्यंत मुदत
यापूर्वी सात-बारावर सामायिक सामूहिक पीक पेरा नोंद होत होती. परंतु, यावर्षी शेतकऱ्याच्या खाते नंबरनिहाय स्वतंत्र पीक पेरा नोंद होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातवर पीक लागवड करणे बंधनकारक आहे. तलाठी कार्यालयाकडून शेतकरी खातेदारांना पीक पेरा प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याने ई-पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत असून, त्यानंतर कारखाना ऊस लागवड, पीक कर्ज किंवा विविध शासकीय अनुदान या नोंदीनुसारच दले जाणार आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी काही अडचण उद्भवल्यास त्यांनी तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन मंडल अधिकारी शंकर पाचभाई, तलाठी नरेश सुतार यांनी केले आहे.
200921\5254img-20210919-wa0003.jpg
फोटो