शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बापानेच घडवून आणला तिघांच्या मदतीने मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:37 IST

मुलगा दारू पिऊन घरी घालायचा गोंधळ

नळदुर्ग (जि़उस्मानाबाद) : मुलाच्या त्रासाला वैतागून लोहगाव येथील एका पित्यानेच इतर तिघांच्या मदतीने मुलाचा खून घडवून आणल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे़ याबाबत रात्री उशिरा शिवाजी भैैरु डबडे  पित्यासह इतर तिघांवर नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील आरोपी पिता शिवाजी भैैरु डबडे यांचा मुलगा डिगंबर डबडे हा नेहमीच दारु पिऊन घरी गोंधळ घालायचा़ त्यामुळे परिवारातील सर्व सदस्य त्याला वैतागले होते. यातूनच शिवाजी डबडे यांनी मुलाचा काटा काढायचे ठरविले. लोहगाव येथील नेताजी ज्योतिबा डबडे, महादेव वैजिनाथ मारेकर व कालिदास बलभीम जाधव  यांच्या मदतीने शिवाजी डबडे यांनी शुक्रवार व शनिवारच्या रात्री मुलाचा खून घडवून आणला. 

ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ यानंतर नळदुर्ग पोलिसांनी पंचनामा केला़ शिवानंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपरोक्त चारही आरोपींविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेनंतर नळदुर्ग पोलिसांनी वेगाने तपास करीत चारही आरोपींना अटक केली आहे़ त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांनाच ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असा घडविला खून...पिता शिवाजी डबडे वगळता इतर तीन आरोपींनी डिगंबर यास दुचाकीवर बसवून शुक्रवारच्या रात्री दारु पाजण्यास नेले़ तेथे दारुत विष मिसळून ते डिगंबरला पाजले़, याद्वारे तो मयत झाला की, नाही याची खात्री होत नसल्याने त्यास दोरीच्या साहाय्याने बाभळीच्या झाडास गळफास दिला़ यानंतर त्याचे प्रेत शेंडगे यांच्या घराजवळील कॅनॉलमध्ये फेकून दिले.