कळंब : सत्यशोधन दिनाचे औचित्य साधून इटकूर येथे ग्रामपंचायत कार्यालय व परिवर्तन विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अंनिसचे मार्गदर्शक, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त तुकाराम शिंदे यांचे सादरीकरण असलेला ‘रहस्य चमत्काराचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात जि. प. चे माजी कृषी सभापती प्रताप पाटील यांच्या हस्ते विना माती, विना तेलाच्या दिव्याचे प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पं.स.चे माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, उपसरपंच विलास गाडे, ग्रा. प. सदस्य गुंडेराव गंभिरे, आबासाहेब आडसूळ, हनुमंत कस्पटे, राजाभाऊ आडसूळ, भाऊसाहेब मोरे, कृष्णा मोरे, महादेव कदम आदी उपस्थित होते. यावेळी तुकाराम शिंदे यांनी समाजात विविध भोंदू लोक आपल्या हातचलाखीने सामान्य लोकांना कसे फसवतात, सहज भासणाऱ्या कोणत्या चमत्कारी कृत्यामागे काय विज्ञान आहे याचा सप्रयोग सादरीकरण करून उलगडा केला. समाजाने डोळस कसे व्हावे याचे प्रशिक्षण दिले. प्रास्तविक लक्ष्मण आडसूळ यांनी केले.
चौकट...
चमत्कारिक गोष्टींचा केला भांडाफोड...
यावेळी तुकाराम शिंदे यांनी करणीचा नारळ, मंत्रांद्वारे अग्नी पेटविणे, जिभेतून तार आरपार, प्रश्न चिन्हे बोटावर पेलणे, पेटता फलिता हातावरून फिरवणे, आग खाणे, लिंबातून करणी काढणे इत्यादी प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रशुद्ध माहिती देऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अंगात येणे, भुताने झपाटणे, करणी, भानामती, जादूटोणा इत्यादी विषयांवर सडेतोड वैज्ञानिक विचार व्यक्त केले.
210921\2546img-20210921-wa0101.jpg
कळंब फोटो