खळबळजनक ! प्राचीन तिर्थकुंडच हडपला, कब्जेखोरावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 11:37 PM2021-08-10T23:37:34+5:302021-08-10T23:41:04+5:30

तुळजापूर शहरातील मंकावती तिर्थकुंड हे मोक्याच्या ठिकाणी आहे. या कुंडास प्राचीन, अध्यात्मिक महात्म्य लाभलेले आहे.

Exciting! Ancient Tirthakund was encroached, a case was registered against the occupier in Osmanabad | खळबळजनक ! प्राचीन तिर्थकुंडच हडपला, कब्जेखोरावर गुन्हा दाखल

खळबळजनक ! प्राचीन तिर्थकुंडच हडपला, कब्जेखोरावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देकागदपत्रात हेराफेरी करून हा कुंड हडपण्याचा त्याचा डाव होता. या कार्यवाहीनंतर रोचकरीची आणखीही काही अशीच प्रकरणे पटलावर येण्याची शक्यता

उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला एक अख्खा तिर्थकुंडच गिलंकृत करण्याचा डाव उधळला गेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश काढताच अपील करून प्रकरण लटकते ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न संपुष्टात येताच इकडे रात्री कब्जेखोरावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला.

तुळजापूर शहरातील मंकावती तिर्थकुंड हे मोक्याच्या ठिकाणी आहे. या कुंडास प्राचीन, अध्यात्मिक महात्म्य लाभलेले आहे. त्याचा उल्लेख विविध पुराणातही आढळून येतो. असे असतानाही तुळजापुरातील देवानंद रोचकरी याने ही जागा आपल्या पूर्वजांची मिळकत असल्याचा दावा केला. हे कुंड नसून विहीर असल्याचेही त्याने आपल्या दाव्यात नमूद केले होते. कागदपत्रात हेराफेरी करून हा कुंड हडपण्याचा त्याचा डाव होता. दरम्यान, याविषयी मनसेसह अन्य काही जणांनी तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी लावली तेव्हा हा प्रकार स्पष्टपणे समोर आला.  यानंतर दिवेगावकर यांनी फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. त्यावर लागलीच रोचकरी याने नगरविकास खात्याकडे अपील केल्यानंतर कारवाईस स्टे देण्यात आला. दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी यावर सुनावणी झाली व १० रोजी नगरविकास खात्याने रोचकरीचे अपील फेटाळून लावले. 

याबाबतचे आदेश धडकताच कोणताही विलंब न करता प्रशासनाने तुळजापूर पोलिसात धाव घेत रोचकरीच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा कलम ४२० अन्वये दाखल केला आहे. अपिलावर स्टे मिळाल्यानंतर सोशल मीडियात 'तुळजापूरचा बाप' म्हणून रोचकरीचा जल्लोष त्याच्या समर्थकांनी केला होता. आता या कार्यवाहीनंतर रोचकरीची आणखीही काही अशीच प्रकरणे पटलावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Exciting! Ancient Tirthakund was encroached, a case was registered against the occupier in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.