शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंतगाव ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत; रस्त्यासाठी गावकऱ्यांनी घेतले जमिनीत अर्धे गाडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:53 IST

अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम चालू होते. मात्र, या कामास गेल्या वर्षभरापासून निधी नसल्याने ते ठप्प झाले.

भूम (जि. धाराशिव) : तालुक्यातील पाथरुड, वालवड, जवळा ते अंतरगाव या रस्त्याचे काम अर्ध्यातच थांबवण्यात आले आहे. ते तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी अंतरगाव ग्रामस्थांनी सोमवारी रोडवर पाच फूट खड्डा खोदून त्यात कमरेपर्यंत स्वतःला गाडून घेत तीन तास आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

भूम तालुक्यातील पाथरुड, वालवड, जवळा, ईडा, गणेगाव ते अंतरगाव हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम चालू होते. मात्र, या कामास गेल्या वर्षभरापासून निधी नसल्याने ते ठप्प झाले. ठेकेदाराने उपलब्ध निधीतून २० टक्केच काम पूर्ण केले आहे. दरम्यान, रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अंतरगाव व परिसरातील गावच्या नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी नागरिकांनी अनेकदा लेखी व तोंडी पाठपुरावा केला. तरीही काम पुढे सरकत नसल्याने आपल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी अंतरगाव येथील सरपंच बिरमस माळी, उपसरपंच अनंता खैरे, संतोष गोरे, जयसिंग गोरे, ओंकार गोरे, गणेश लोद व ग्रामस्थांनी स्वत:ला जमिनीत अर्धे गाडून घेत आंदोलन केले. बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर तीन तासांनी हे आंदोलन थांबविण्यात आले.

म्हणून आली गाडून घेण्याची वेळहे रस्ता काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी, वयस्क नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामासाठी निधी नसेल तर कामाची सुरुवातच करायची नव्हती. अनेकदा काम सुरू करण्याबाबत कळवूनही बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने जमिनीत गाडून घेण्याची वेळ आली.- जयसिंग गोरे, ग्रामस्थ, अंतरगाव

निधीसाठी पत्रव्यवहारनिधी उपलब्ध झाला नसल्याने या रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. वरिष्ठ कार्यालयाकडे निधीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच निधी उपलब्ध करून घेत काम पूर्ण करण्यात येईल.- आर.आर. गिराम, उपअभियंता, भूम

टॅग्स :dharashivधाराशिवagitationआंदोलन