कंटेकूर येथून दुचाकी पळविली
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कंटेकूर येथील घरासमाेर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली. ही घटना २५ फेब्रुवारीच्या रात्री घडली. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र शाेध घेतला; परंतु दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे सुरेश जमादार यांनी मुरूम पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध १ मार्च राेजी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावणेतीनशे चालकांवर कारवाई
उस्मानाबाद : माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे २७२ वाहनचालकांविरुद्ध १ मार्च राेजी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हाभरातील अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेने केली. संबंधितांकडून तडजाेड शुल्कापाेटी ७३ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पाेलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले.
आपसिंग्यातील जुगार अड्ड्यावर छापा
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यासमाेरील एका जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी १ मार्च राेजी छापा मारला. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह राेख २ हजार ५८० रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी अविनाश महादेव राेकडे याच्याविरुद्ध तुळजापूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.