शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिव पालिकेच्या तीन प्रभागातील निवडणुका स्थगित; निवडणूक आयोगाने का केली कार्यवाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:47 IST

धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी व ४१ नगरसेवक पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

धाराशिव : धाराशिव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी छाननीच्या वेळी अर्ज वैध-अवैध ठरविल्याच्या कारणावरून तीन प्रभागातील उमेदवार न्यायालयात गेले होते. त्यांच्या प्रकरणाची सुनावणी विहित वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी या तिन्ही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याच्या सूचना पालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी व ४१ नगरसेवक पदांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. छाननीदरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक २ अ, ७ ब व १४ ब या प्रभागातील अर्जाच्या वैध-अवैधतेवरून वादंग झाले. यामुळे संबंधित आक्षेपकर्त्यांनी व उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या प्रकरणावर चिन्ह वाटपापूर्वी निर्णय अपेक्षित होते. मात्र, विहित वेळेत न्यायालयीन आदेश प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी २६ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही मार्गदर्शन मागवले. त्यास आयोगाने संबंधित प्रभागातील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याच्या सूचना केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्राद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या निवडणुका स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमके कशामुळे प्रकरण न्यायालयात...प्रभाग २ अ मधील उमेदवार सोनाली माने यांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. न्यायालयाने हा अर्ज स्वीकार करण्याचे आदेश बुधवारी रात्री दिले. प्रभाग १४ ब मधील उमेदवार संजयकुमार वाघमारे यांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडली नसल्याने अर्ज अवैध ठरला. न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला.

भाजपच्या शहराध्यक्षांना फटका...भाजपचे शहराध्यक्ष अमित शिंदे हे प्रभाग ७ ब मधून उमेदवार होते. ते पालिकेच्या गाळ्याचे लाभधारक असल्याचा दावा करीत प्रतिस्पर्धी कृष्णा मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. तो फेटाळून लावल्यानंतर मुंडे न्यायालयात गेले. न्यायालयानेही मुंडे यांचा दावा फेटाळून लावला. असे असले तरी तूर्त त्यांच्या प्रभागातील निवडणूक स्थगित झाल्याने शिंदे यांना फटका बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv Municipal Elections Postponed in Three Wards; Reason Revealed.

Web Summary : Court cases over candidate eligibility in Dharashiv led to the postponement of municipal elections in wards 2A, 7B, and 14B. The State Election Commission ordered the delay due to pending court decisions, impacting candidates like a BJP city president.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकdharashivधाराशिव