शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींचा पोलीस स्थानकावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:59 IST

विद्यार्थिनींना शाळेत जाताना मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

येणेगूर (उस्मानाबाद) : रोडरोमिओंच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी आठ वाजता येथील पोलीस दूरक्षेत्र व ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. 

उमरगा येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाताना मागील काही महिन्यांपासून रोडरोमिओंच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. असे असतानाच काही दिवसांपासून तर संबंधित तरूण दुचाकीवरून विद्यार्थिनींना कट मारून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रोडरोमिओंच्या या सततच्या त्रासाला वैतागलेल्या विद्यार्थिनींनी बुधवारी सकाळी येणेगूर पोलीस दूरक्षेत्रावर मोर्चा काढला. रोडरोमिओंचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यानंतर  पोहेकॉ. निवृत्ती बोळके व पोना दिगंबर सूर्यवंशी यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गोपनियरित्या चिठ्ठ्या टाकून त्रास देणाऱ्या टवाळखोरांची नावे देण्याबाबत पोलिसांनी विद्यार्थिनींना सांगितले असता, या माध्यमातून चार ते पाच टवाळखोरांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. संबंधित टवाळखोरांवर त्वरित करावाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

यानंतर विद्यार्थिनींनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळविला. या ठिकाणी उपसरपंच वैभव बिराजदार, बसवेश्वर माळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर धामशेट्टी,  सदस्य अमोल स्वामी, सतीश मुदकण्णा यांनी विद्यार्थिनींचे निवेदन स्विकारले. थोडाही विलंब न करता, ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्र देऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे विद्यार्थिनींसह पालकांचेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाStudentविद्यार्थी