कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या ‘एक रुपया तुमचा, गणपती बाप्पा आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी प्रत्येक कुटुंबाना प्रत्येकी एक मूर्ती याप्रमाणे तीन हजार गणेशमूर्तींचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या आदेशावरून व खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश जमाले यांनी ‘मूर्ती आमची, भक्ती तुमची’ या संकल्पनेतून कसबे तडवळेसह परिसरातील गावात प्रति कुटुंब एक याप्रमाणे तब्बल तीन हजार गणेश मूर्तीसह पूजेचे साहित्य व आरतीचे पुस्तकाचे वाटप येथील शिवाजी चौकात केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, चंद्रप्रकाश जमाले, शंकर होगले, माजी उपसरपंच विजयसिंह जमाले, तुळशीदास जमाले, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सोमाणी, रामचंद्र महाराज गोसावी, अब्दुलरहेमान तांबोळी, किशोर डाळे, डॉ. धनंजय करंजकर, डॉ. उमाकांत सुतार, पांडुरंग विभुते, मनोज जमाले, शिवाजी नाळे, धनंजय धाबेकर, पंकज जमाले, बबलू जमाले, अक्षय होगले, राजाभाऊ घोडके, बाळू इंगळे, दादासाहेब लोंढे, गोविंद जमाले, अनिस शेख, बाळासाहेब करंजकर, धर्मराज निकम, किरण भिंगारे, मारुती शिंदे, जयभवानी प्रतिष्ठानचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने शैक्षणिक, सामाजिक, उपक्रम राबवले जातात. यावर्षी कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. लोकांची आर्थिक घडी विस्कटली. अशा स्थितीत गणेशमूर्ती विकत घेणे कठीण होत असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ‘एक रुपया एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला. यापुढेही प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रात योगदान देणार आहे.
- गणेश जमाले, संस्थापक अध्यक्ष