शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

घृणास्पद ! कोरोना निगेटिव्ह असतानाही वडिलांचा मृतदेह मुलाने नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:16 IST

शेवटी उस्मानाबाद पालिकेने केला अंत्यविधी

ठळक मुद्देवडिलांचा मृतदेह दवाखान्यातच ठेऊन मुलगा गायबअंत्यविधीसही झाला होता विरोध़

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीच्या मुलाने भितीपोटी मृतदेह तेथेच सोडून पोबारा केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे़ अंत्यविधीस कोणीही समोर येत नसल्याने अखेर पालिका कर्मचाऱ्यांनीच बुधवारी दुपारी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले़

कोरोनामुळे नात्यातील अन् मनामनातील अंतरही वाढीस लागल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत़ वार्धक्याने जरी मृत्यू झाला तरी मयत व्यक्तीच्या अंत्यविधीला नाना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे़ विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा मोठाच धसका लोकांनी घेतला आहे़ त्याची झळ मयताच्या कुटूंबियांनाही सोसावी लागत आहे़ याचेच एक उदाहरण बुधवारी उस्मानाबादेतील घटनेवरुन समोर आले़ परंडा तालुक्यातील एका ७० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना परंडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथून पुढील उपचारासाठी त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले़ उपचार सुरु असताना या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली़ त्याचा अहवाल निगेटीव्ह आला.

मात्र, त्या व्यक्तीने उपचारादरम्यानच दोन दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला़ उपचार सुरु असताना या व्यक्तीचा मुलगा त्यांच्यासोबतच होता़ मात्र, मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह रुग्णालयातच सोडून एकट्यानेच गाव गाठले़ गावाकडे अंत्यविधीस विरोध होईल, मृतदेह नेता येणार नाही, असे आगतिकपणे सांगून त्याने गुपचूप रुग्णालय सोडले़ मयताच्या कुटूंबियांशी संपर्क केल्यानंतरही त्यांनी मृतदेह स्विकारण्यास असमर्थतता दर्शविल्याने नाईलाजास्तव पोलिसांनी उस्मानाबाद पालिकेला अंत्यविधीसाठी आर्जव केले़ पालिका कर्मचाऱ्यांनी मग पुढाकार घेऊन मयतावर सार्वजनिक स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार केले़ या घटनमुळे कोरोनाने निर्माण केलेली भिती, अंधविश्वास अन् मनामनात निर्माण केलेली दरी अधोरेखित झाली आहे़ 

अंत्यविधीसही झाला होता विरोध़उस्मानाबाद पालिकेकडून बेवारस असलेल्या मृतदेहांवर वेळोवेळी अंत्यसंस्कार केले जातात़ यासाठी शहरालगतचीच एक शासकीय जागा निश्चित केलेली आहे़ त्यामुळे याहीवेळी नेहमीप्रमाणे या जागेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका कर्मचारी मृतदेह  घेऊन गेले़ मात्र, याच भूखंडावर वास्तव्य करुन राहिलेल्या काही नागरिकांनी असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करीत अंत्यविधीस विरोध केला़ परिणामी, तो मृतदेह घेऊन कर्मचारी सार्वजनिक स्मशानभूमीत गेले अन् तेथेच अंत्यविधी केला़ 

मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़कोरोनामुळे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही़ शिवाय, मृत्यू झाला तरी यंत्रणा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देत नाही़ त्यामुळे एखाद्या अन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मरणोपरांत सामाजिक छळ होणे उचित नाही़ अशा प्रकारचे ‘सोशल डिस्टन्स’ मानवी मनाला यातना देते़ त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊन मृतदेह बेवारस सोडणे, अंत्यविधीस विरोध करणे योग्य नाही़ नागरिकांनी सांमजस्याची, मानवतेची भूमिका घेतली पाहिजे़- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबादhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या